मुंबई,: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचनालयानं नोटीस बजावल्यामुळे राज्यात रान पेटलं आहे. त्यात आता ED कडून वर्षा राऊत यांना नवे समन्स बजावण्यात आले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असं वर्षा राऊत यांना सांगण्यात आले आहे.
संजय राऊत यांचे बंधु प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची यापूर्वी चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे बाकी असल्याचं ED च्या समन्समध्ये सांगण्यात आलं आहे.दरम्यान, EDने वर्षा राऊत यांना आज 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं.मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ED ने नवे समन्स बजावण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

