कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यासह आर्थिक दुरावस्था – आ. चंद्रकांत पाटील

Date:

  • अभिनेते आनंद इंगळे व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने घरेलू कामगार महिलांना किराणा किट वाटप.

पुणे- कोरोना काळात कष्टकरी वर्गाला आरोग्य समस्ये सह आर्थिक संकटाचा ही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला, अश्या वेळी आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी दिला जावा अशी समाजातील अनेकांची भावना दिसून आली हीच आपली संस्कृती आहे असे प्रतिपादन येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

अभिनेते आनंद इंगळे यांच्या सहकार्याने क्रिएटिव्ह फाउंडेशन ने आयोजित केलेल्या घरेलू कामगारांना किराणा किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे,राहुल सोलापूरकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला,कोथरूड मंडळ अध्यक्ष पुनीत जोशी,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, जयश्री तलेसरा, मंगलताई शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथनीकर, युवा मोर्चा शहर सरचिटणीस दीपक पवार,किरण देखणे, निलेश कोंढाळकर, विशाल रामदासी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर आ. चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला


यावेळी अंतर्नाद योग केंद्र व निसर्गायन बाल वाचनालायचे संचालक व प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ अनुज खरे, पुष्कर चौबळ व संदीप खर्डेकर यांनी आ. चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वाघाचे शिल्प भेट दिले तर विक्रम पोतदार यांनी ड्रोन च्या माध्यमातून जंगलात काढलेल्या निसर्गचित्राचे विहंगम हे पुस्तक भेट दिले.यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात अनेक हात मदतीसाठी पुढे आले मात्र सरकारने करण्यासारखे खूप काही असल्याचे नमूद केले.तसेच अनेकांचे रोजगार बुडाले आहेत त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगतानाच याच भावनेतून वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून 2000 रिक्षाचालकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे CNG कुपन मोफत वाटले असल्याचे सांगितले. दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येऊच नये यासाठी लसीकरण महत्वाचे असून त्यासाठी वंचित घटकांना उद्या मोफत लसीकरण मोहीम राबवत असल्याचे ही पाटील म्हणाले.
तत्पूर्वी आनंद इंगळे यांनी कर्तव्य भावनेतून काही घरेलू कामगार भगिनींना मदत करत असून संकटकाळात प्रत्येकाने पुढे येऊन आपले देणे दिले पाहिजे. मात्र उद्या जेव्हा घेणाऱ्यांचे चांगले दिवस येतील तेव्हा त्यांनी देखील समाजातील गरजूना मदत करावी असेही आनंद इंगळे म्हणाले. राहुल सोलापूरकर यांनी जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जावा असे सांगतानाच मी स्वतः शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली व या माध्यमातून नागरिकांना लसीकरण करण्यास प्रेरित केले असे स्पष्ट केले. सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की घरेलू कामगार महिलांना मोठया आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, अनेकांच्या घरातील कमावते पुरुषांचा रोजगार बुडाला म्हणून या भगिनींना आधाराची गरज असल्याने किराणा किट वाटपाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...