ईझबझला आरबीआयकडून पेमेंट अ‍ॅग्रीग्रेशन अथोरायझेशनसाठी तत्वतः मंजुरी

Date:

पुणे११ ऑगस्ट २०२२  पेमेंट सोल्यूशन्स प्लॅटफॉर्म ईझबझ प्रा. लि. ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर (पीए) अथोरायझेशनसाठी तत्वतः मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले.

ईझबझ हा डिजिटल प्लॅटफॉर्म असून तिथे व्यवसायांना ‘टेक्नॉलॉजीवर आधारित उपाययोजना’ पेमेंट्सह दिल्या जातात व त्यामुळे त्यांना वसुलीचे डिजिटायझेशन सहजपणे करता येते. इतक्या वर्षांत कंपनीने परवडणारे, वापरण्यास सोपे एपीआयवर आधारित प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, ज्याच्या मदतीने छोट्या व्यवसायांना वसुलीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ‘सुविधा’ उपलब्ध होतात. अनुदानित किंमतीच्या बाबतीतही त्यांना लाभ होतो तसेच एकत्रीकरणास सोपे एपीआय आणि एंड युजरसाठी सर्व प्रकारच्या पेमेंट पद्धतींचाही त्यात समावेश असतो.

अतिशय सोप्या पद्धतीने अवलंब करता येण्यासारख्या, विस्तारक्षम एपीआय सुविधांच्या मदतीने ईझबझ एमएसएमईजसाठी पेमेंटच्या पूर्ण प्रक्रिया मिळवून देत आहे. त्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या ६३ दशलक्ष भारतीय एमएसएमईजसाठीची आर्थिक ऑपरेटिंग सिस्टीम बनून डिजिटल क्रांती घडवून आणण्याचे ध्येय आहे.

याविषयी ईझबझचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित प्रसाद म्हणाले, ‘आरबीआय रेग्युलेशनमुळे डिजिटल पेमेंट इकोसिस्टीममध्ये निश्चितच आणखी विश्वासार्हता तयार होते आणि आमच्यासारख्या कंपन्यांना नाविन्यपूर्ण सुविधा तयार करून देशातील डिजिटल पेमेंट्सच्या वाढीला चालना व बळकटी देण्यास मदत होते. सुरक्षित, अत्याधुनिक आणि वापरण्यास सोप्या पेमेंट पद्धती तयार करण्यावर आमचा भर असून या पद्धती भारतीय एसएमईंजना सहजपणे उपलब्ध करून देत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचे ध्येय आहे.’

मार्च २०२० मध्ये आरबीआयने ऑनलाइन क्षेत्रातील पेमेंट सुविधा देणारे पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर्स आणि पेमेंट गेटवेजचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. या तत्वांनुसार पेमेंट अ‍ॅग्रीग्रेटर्स ई- कॉमर्स साइट्सच्या सुविधा उपलब्ध करून देणारे व व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून वेगवेगळ्या पेमेंट पद्धती स्वीकारण्याची क्षमता देणारे तसेच त्यासाठी व्यापाऱ्यांना त्यांची स्वतःची पेमेंट इंटिग्रेशन यंत्रणा तयार करण्याची गरज भासू न देणारे घटक आहेत. पीएजमुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या प्राप्तीकर्त्यांशी जोडून घेता येते. या प्रक्रियेदरम्यान त्यांना ग्राहकांकडून पेमेंट्स मिळतात, ते एकत्रित करून कालांतराने व्यापाऱ्यांना हस्तांतर केले जाते.

ईझबझ प्रालि.

ईझबझ ही पुण्यात स्थित असलेली फुल- स्टॅक कंपनी असून विविध क्षेत्रांतील अंदाजे ७०,००० व्यवसायांना सेवा देते. कंपनीद्वारे लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांना डिजिटल वसुलीला चालना देण्यासाठी मदत करण्यावर भर दिला जातो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...

शरद पवार गटाच्या २५२ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...