पुण्यातून वर्षभरात ९० लाख प्रवाशांचे उड्डाण -इझी मायट्रिप ने दिली विशेष ऑफर

Date:

पुणे:विविध ठिकाणांहून दररोज 25 हून अधिक विमाने पुण्याच्या दिशेने उड्डाण करतात. एएआयने दिलेल्या एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीतील आकडेवारीनुसार, या विमानतळावर 90 लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली आहे.इझी मायट्रिप.कॉम (ईएमटी) या ऑनलाइन ट्रॅव्हल अॅग्रिगरेटर्स श्रेणीतील एका आघाडीच्या कंपनीने कृतज्ञता म्हणून पुण्यातील ग्राहकांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. कंपनीने खास पुणेकरांसाठी आकर्षक विमान सवलत जाहीर केली आहे.

पुणे हे एक झपाट्याने वाढणारे महानगर आहे आणि मुंबईनंतचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी नावाजलेले हे शहर अनेक खेळ, योग, आयुर्वेद आणि सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांचे माहेरघर आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी व आयटी प्रोफेशनल करिअरच्या संधी शोधण्यासाठी या सुंदर शहराकडे प्रवास करत असल्याने पुण्यामध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसेच, हे शहर आयटी केंद्र बनले असून तेथे अनेक आयटी/टेक स्टार्ट-अप सुरू होत आहेत.

ईएमटीच्या युजर्समध्ये पुण्याचे योगदान 6% हून अधिक आहे आणि 2020 या आगामी वर्षात ते 20% हून अधिक करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सध्या, पुणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे आणि या शहरातून आम्हाला जास्तीत जास्त बुकिंग मिळत असून ते पाचव्या स्थानी आहे. उद्योग व संस्था याबरोबरच, या शहरामध्ये शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, एम्प्रेस गार्डन, कात्रज स्नेक पार्क, ओशो आश्रम, राजा दिनकर केळकर म्युझिअम अशी पर्यटनस्थळेही आहेत.

प्रगती करण्याच्या व पर्यटनाच्या संधी लक्षात घेऊन, कंपनीने केवळ पुण्यातील ग्राहकांसाठी देशांतर्गत विमानांसाठी 500 रुपये आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी 2000 रुपये सवलत जाहीर केली आहे. यासाठी पुणेकरांनी इझमायट्रिपद्वारे विमानाचे तिकीट बुक करावे आणि त्यांच्या विमान तिकिटाच्या बुकिंगवर आकर्षक सवलत मिळण्यासाठी “EMTPUNE” हा प्रोमो कोड वापरावा.

याविषयी बोलताना, इझीमायट्रिपचे कार्यकारी संचालक प्रशांत पिट्टी यांनी सांगितले, रहिवासी व व्हिजिटर यांच्यासाठी पुणे येथे आदर्श राहणीमान, शांत वातावरण, आल्हाददायक हवामान व नैसर्गिक सौंदर्य आहे. जगाच्या विविध भागांतील लोक शिक्षणासाठी व प्रसिद्ध ओशो आश्रमाला भेट देण्यासाठी या शहरात येतात. यामुळे या शहरात विस्तार करण्यासाठी इझमायट्रिपसाठी मुबलक संधी उपलब्ध आहे. आतापर्यंत, या शहरातून आम्हाला दरमहा अंदाजे 22 हजार बुकिंग मिळतात. परंतु, आम्हाला ही संख्या येत्या वर्षात किमान 50% वाढवायची आहे. आम्ही पुण्यातील ग्राहकांसाठी काही प्रमोशनल ऑफर जाहीर केल्या आहेत आणि येथे आमचा ग्राहकवर्ग व बाजारहिस्सा वाढवण्यासाठी सेवांमध्ये यापुढेही वाढ करणार आहोत.

व्यवसायाचे धोरण म्हणून, या क्षेत्रातील अन्य कंपन्या आकारत असल्या तरी इझमायट्रिप मात्र आपल्या वेबसाइटवरून केल्या जाणाऱ्या कोणत्याही विमान तिकिटाच्या बुकिंगवर ग्राहकांना कोणतीही कन्व्हिनिअस फी आकारत नाही. मुंबई विमानतळाची अंशतः धावपट्टी बंद असण्याच्या कालावधीदरम्यान कंपनीने आसपासच्या विमानतळांवरून मुंबईसाठी मोफत बस तिकीटही जाहीर केले आहे. इझमायट्रिप आपल्या ग्राहकांसाठी प्रवासाचे बुकिंग सुलभ व सुरळित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना चिंतामुक्तपणे प्रवास करता यावा, यासाठी त्यांच्या सगळ्या चिंतांची जबाबदारी घेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

इझीमायट्रिप

इझी ट्रिप प्लॅनर्स लि. (इझमायट्रिप.कॉम) ही दिल्लीतील ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी असून तिची स्थापना रिकांत पिट्टी व निशांत पिट्टी यांनी मे 2008 मध्ये केली. भारतीय ट्रॅव्हल उद्योगातील ही एक आघाडीची कंपनी आहे आणि ती सर्वोत्तम डील देते. 47,500 नोंदणीकृत एजंट पार्टनर्सचे जाळे असणारी आणि 8.5 दशलक्षहून अधिक थेट ग्राहक असणारी ही कंपनी एजंटचे जाळे, कार्यालये व फ्रेंचाइजी याद्वारे प्रत्येक पि-कोडमध्ये कार्यरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...