Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव

Date:

 पुणे दि.29:- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.

          वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी.व्हॅन या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील. याची  वाहन मालक, चालक, वित्तदाते यांनी नोंद घ्यावी.

          ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छूक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी वाहने अटकावून ठेवलेल्या स्थळी करता येईल.

          जाहिर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी 1 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.

          ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर 1 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी रु.5 हजार रकमेचा डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड या नावे अनामत रक्कमेचा धनाकर्षा सह ऑनलाईन सादर केलेल्या  कामगदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व  मान्यतेसाठी सादर करणे गरजेचे आहे.

          लिलावाचे अटी व नियम शुक्रवार 27 सप्टेंबर 2021 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी 10  ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहिर ई- लिलावाद्वारे विकली जातील.

          कोणेतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...