पुणे: “काही दशकांपूर्वी साईबाबांनी दिलेली ‘श्रद्धा आणि सबुरी’ची शिकवण आजच्या काळाशीही सुसंगत ठरली असून, समाजातील प्रत्येक घटकाने श्रद्धा आणि सबुरीची योग्यप्रकारे सांगड घातल्यास रोजच्या जगण्यातही अध्यात्माचा अनुभव घेणे शक्य होईल”, असे मत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु पी. डी. पाटील यांनी, बावधन येथील पेबल्स टु या गृहप्रकल्पामध्ये श्री साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना व्यक्त केले. औदुंबर येथील वामानानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनानुसार काशी येथील ईश्वरशास्री घनपाठी, गणेश्वरशास्री द्रविड, शिर्डी येथील आजेगांवकर, गोकर्णचे गणेशजी जोगळेकर, पुण्याचे स्वानंदशास्रीह धायगुडे यांनी मंत्रोच्चारांच्या जयघोषात विधीवत या मूर्तीची प्रतिष्ठापना केली .
ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरण संरक्षणाचे भान ठेवत निसर्ग साखळीला चालना देणारा पेबल्स टु हा गृहप्रकल्प त्याच्या उर्जादायी संकल्पनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. चार हजार स्केअर फुट क्षेत्र असलेले श्री साईबाबांचे सुंदर मंदिर येथील निसर्गसुंदर वातावरणाला अध्यात्मिक सौंदर्याची जोड देणारे ठरले आहे.