सोमैय्या यांच्या समोर घोषणाबाजी करणाऱ्यात आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची
पुणे – येथील आयकर सदनात आलेल्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला,मात्र यावेळी सोमैया आयकर कार्यालयात होते ,बाहेर हे दोघे दिसताच पोलिसांनी त्यांना लगेचच तिथून ताब्यात घेऊन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला . मात्र या कार्यकर्त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून झाला ,यामुळे तणाव वाढतच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि गाडीत बसवून घेऊन गेले .
सोमय्या म्हणाले की पोलिसांनी पवार यांच्या माणसांना मला भेटू द्यायला हवे होते. घोटाळा कसा झाला हे मी त्यांना सांगितले असते. शिवसेनेने मागील वेळी सोमय्या यांनी महापालिकेच्या आवारात धक्काबुक्की केली होती. ते लक्षात ठेवून भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी सोमय्या यांच्याभोवती कडे केले होते. माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर, भरत वैरागे , कविता वैरागे ,गणेश शेरला तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता .

