इफफी दरम्यान 24 चित्रपट/लघुपट आणि 20 माहितीपट दाखवले जाणार

Date:

मुंबई-गोव्यात सुरु होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,  52 व्या इफ्फीदरम्यान भारतीय पॅनोरमा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे गोवा राज्य सरकारतर्फे 20 ते 28 नोव्हेंबर, 2021 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. निवडण्यात आलेले सगळे चित्रपट सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधी यांना इफ्फीदरम्यान दाखवले जाणार आहेत..

भारतीय पॅनोरमाचा मुख्य उद्देश या महोत्सवात भारतीय निर्मात्यांनी तयार केलेल्या चित्रपट आणि माहितीपटांची निवड करणे हे असून त्यासाठी चित्रपटाची निर्मिती, संकल्पना आणि इतर सौन्दर्यातील उत्कृष्टतेचे निकष तपासले जातात. चोखंदळपणे निवडलेल्या भारतीय चित्रपट कलेचे विविध श्रेणींअंतर्गत प्रदर्शन करुन, त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी या अंतर्गत पार पडली जाते.भारतीय पॅनोरमाच्या स्थापनेपासूनच त्या अंतर्गत त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात.

चित्रपट निवड समितीच्या ज्युरी सदस्यांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माते आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे.फिचर (कथा)आणि नॉन फिचर (कथाबाह्य) अशा दोन्ही चित्रपटांची निवड करण्यासाठी ज्युरी सदस्यांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आणि अभ्यासाच्या आधारे या पॅनोरमाची निवड करतात.

फिचर चित्रपट(कथा चित्रपट)

यंदाच्या इफफीसाठी   फिचर फिल्म प्रकारात चित्रपट निवडण्यात आले आहेत. 221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून हे 24 चित्रपट निवडण्यात आले आहेत. या पैकेजमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील विविधरंग आणि वैविध्याचे दर्शन घडते.

फिचर फिल्मच्या ज्युरी सदस्यांमध्ये 12 सदस्य असून, या समितीच्या अध्यक्षपदी एस.व्ही. राजेंद्र सिंग बाबू आहेत. तसेच या ज्युरी सदस्यांमध्ये असे सदस्य आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध उत्तम चित्रपटांची निर्मिती केली असून अनेक चित्रपट संस्था किंवा व्यवसायांचे ते प्रतिनिधी आहेत. हे सर्व सदस्य मिळून भारतीय चित्रपट सृष्टीचे समग्र प्रतिनिधित्व करतात:

  1. श्री राजेंद्र हेगडे, आत्मचरीत्रकार
  2. मखोन्मानी मोंगसाबा, चित्रपट निर्माते
  3. विनोद अनुपमा, चित्रपट समीक्षक
  4. जयश्री भट्टाचार्य, चित्रपट निर्मात्या
  5. ज्ञान सहाय, छायाचित्रकार
  6. प्रशांतू मोहपत्रा, छायाचित्रकार
  7. हेमेंद्र भाटिया, अभिनेता/लेखक/चित्रपट निर्माते
  8. असीम बोस, छायाचित्रकार,
  9. प्रमोद पवार, अभिनेता
  10. आणि
  11. चित्रपट निर्माता मंजुनाथ टी एस, छायाचित्रकार
  12. मलय रे,चित्रपट निर्माते
  13. पराग चाफेकर,चित्रपट निर्माते/ पत्रकार.

इंडियन पॅनोरमामध्ये निवड झालेल्या 24 चित्रपटाची यादी खालील प्रमाणे आहे:

अनु क्रचित्रपटाचे नावभाषादिग्दर्शक
 कालकोकोहोबंगालीराजदीप पॉल आणि शर्मिष्ठा मैती
 नितंतोई सहज सरलबंगालीसत्राबीत पॉल
 अभिजानबंगालीपरंबात्रा चटोपाध्यय
 माणिकबाबूर मेघबंगालीअभिनंदन बॅनर्जी
 सिजोऊबोडोविशाल पी छलिया
 सेमखोरदिमासाऐमी बरुआ
 21वा टिफिनगुजरातीविजगिरी बावा
 एट डाऊन तुफान मेलहिंदीअंकित सिंग
 अल्फा बीटा गामाहिंदीशंकर श्रीकुमार
 डोल्लूकन्नडसागर पुराणिक
 तलेदंडकन्नडप्रवीण कुरुपकर
 ऍक्ट – 1978कन्नडमंजुनाथ एस. (मैसूर)
 निली हक्कीकन्नडगणेश हेगडे
 निराये ठाठाकलूल्ला माराममल्याळमजयराज
 सनीमल्याळमरणजित शंकर
 मी वसंतरावमराठीनिपुण अविनाश धर्माधिकारी
 बिटरस्वीटमराठीअनंत नारायण महादेवन
 गोदावरीमराठीनिखिल महाजन
 फ्युनरलमराठीविवेक राजेंद्र दुबे
 निवासमराठीमेहुल अगजा
 बुम्बा राईडमिशिंगबिस्वजित बोरा
 भागवादज्जुकमसंस्कृतयदु विजयकृष्णन
 कुझंगलतामिळविनोथराज पी एस
 नाट्यमतेलुगूरेवंथ कुमार कोरुकोंडा

भारतीय पॅनोरमा 2021 साठी उदघाटनाचा चित्रपट म्हणून ज्यूरींनी निवडलेला चित्रपट आहे- सेमखोर (दिमासा) श्रीमती ऐमी बरुहा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट

नॉन फिचर( कथा बाह्य) चित्रपट

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमामध्ये सामाजिक आणि सौन्दर्यदृष्ट्या विविधरंग असलेल्या सामाजिक कथाबाह्य चित्रपटांचा समावेश आहे. माहितीपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सन्माननीय ज्युरी सदस्यांनी महितीपटांची निवड केली आहे.

नॉन – फिचरच्या सात परीक्षकांच्या चमूचे नेतृत्व प्रसिद्ध माहितीपट निर्माते एस नल्लामुथु यांनी केले. परीक्षकांच्या चमूत खालील सदस्य होते.

  1. आकाशादित्य लामा, चित्रपट निर्माते
  2. सिबानू बोरा, माहितीपट निर्माते
  3. सुरेश शर्मा, चित्रपट निर्माता
  4. सुब्रत ज्योती नियोग, चित्रपट समीक्षक
  5. मनीषा कुलश्रेष्ठ, लेखिका
  6. अतुल गंगवार, लेखक

203 समकालीन भारतीय नॉन फिचर चित्रपटांमधून निवडलेले चित्रपट आपल्या प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या नोंदी घेण्याच्या, शोधकवृत्तीचे आणि मनोरंजन करण्याच्या क्षमतेचे तसेच समकालीन भारतीय मूल्यांचे उत्तम उदाहरण आहे.

एकूण 20 नॉन – फिचर फिल्म्स इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

या विभागात निवड झालेल्या 20 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे :

अ.क्र.चित्रपटाचे शीर्षकभाषादिग्दर्शक
 वीरांगनाआसामीकिशोर कलिता
 नाद– द साऊंडबंगालीअभिजित ए पॉल
 सैनबरी टू संदेशखालीबंगालीसंघमित्रा चौधरी
 बादल सरकार अँड द अल्टरनेट थिएटरइंग्रजीअशोक विश्वनाथ
 वेद.. द व्हिजनरीइंग्रजीराजीव प्रकाश
 सरमाउंटीग चॅलेंजेसइंग्लिशसतीश पांडे
 सनपट (Sunpat)गढवालीराहुल रावत
 द स्पेल ऑफ पर्पलगुजरातीप्राची बजानिया
 भारत, प्रकृती का बालकहिंदीडॉ. दीपिका कोठारी अँड रामजी ओम
 तीन अध्यायहिंदीसुभाष साहू
 बबलू बेबीलॉन सेहिंदीअभिजीत सारथी
 द नॉकरहिंदीअनंत नारायण महादेवन
 गंगा पुत्रहिंदीजय प्रकाश
 गजराहिंदीविनीत शर्मा
 जुगलबंदीहिंदीचेतन भाकुनी
 पाबुन्य स्याममणिपुरीहबोम पबन कुमार
 मर्मर्स ऑफ द जंगलमराठीसोहिल वैद्य
 बॅकस्टेजउडियालिपिका सिंग दराईब
 विचसंथालीजॅकी आर. बाला
 स्वीट बिरीयानीतामिळजयचंद्र हाश्मी

भारतीय पॅनोरमा मध्ये कथाबाह्य चित्रपट विभागात ज्यूरींनी निवड केलेला उदघाटनाचा चित्रपट म्हणजे- वेद… द  व्हिजनरी हा राजीव प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...