डिझेल, टायर सह अन्य गोष्टींच्या भाव वाढीमुळे बस व कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांची वाढ

Date:

पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
पुणे : डिझेलने ओलांडलेली शंभरी, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य आवश्यक गोष्टींच्या वाढलेल्या किंमती, टोल व करांमध्ये झालेली वाढ यामुळे नाईलाजाने बस आणि कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने बस व कारवरील करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे राज्यव्यापी अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे झालेल्या या सभेवेळी असोसिएशनचे सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनवणे, कार्याध्यक्ष किरण देसाई, सल्लागार अनंत पुराणिक, जिल्हा शालेय सुरक्षा समितीचे सचिन पंचमुख आदी उपस्थित होते. राज्यभरातून जवळपास ५००-६०० बस आणि कार मालक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.
राजन जुनवणे म्हणाले, “पुण्यात छोट्या-मोठ्या अशा जवळपास १६००० बसेस असून, १००० पेक्षा अधिक बस व कारमालक असोसिएशनचे सभासद आहेत. कोरोना काळात जवळपास १९ महिने गाड्या जागेवर उभ्या होत्या. त्यामुळे व्यवसाय आधीच डबघाईला आलेला असताना, त्यात डिझेल, टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट्स यासारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी, गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.”
“कोरोनाच्या या काळात १३ सीटर ते ४९ सीटर बस, स्कुल बस, व्होल्वो, इंटरसिटी बसेस, कार सगळ्यांनाच मोठा फटका बसला आहे. राज्य शासनाने किंवा परिवहन विभागाने याची कसलीही दखल घेतलेली नाही. अनेक गाड्यांवर बँकांची, फायनान्स कंपन्यांची कर्जे आहेत. त्याचे हप्ते फेडणे अवघड झालेले आहे. अशावेळी ही भाडेवाढ करणे क्रमप्राप्त होते. ही दरवाढ प्रवाशांना भुर्दंड म्हणून नाही, तर आम्हा बस व कार व्यावसायिकांना पुन्हा व्यवसायात सावरता यावे, यासाठी आहे,” असे किरण देसाई म्हणाले.

नव्या कार्यकारिणीची निवड

पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड या सर्वसाधारण सभेत झाली. यामध्ये अध्यक्षपदी राजन जुनवणे, उपाध्यक्षपदी सुनील मोरे, सचिवपदी तुषार जगताप, खजिनदारपदी दिनेश सोनवणे, कार्याध्यक्षपदी किरण देसाई, सल्लागारपदी अनंत पुराणिक यांची निवड करण्यात आली.

बस व कारमालकांसाठी सुरक्षाबंधनकोरोनानंतर सभासदांमध्ये आलेली मरगळ झटकावी, त्यांच्यातील नैराश्य दूर व्हावे व पुन्हा जोमाने व्यवसायाला सुरुवात करावी, या उद्देशाने पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या वतीने सुरक्षाबंधन या विशेष कार्यक्रमांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन, भेटीगाठी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन आदीनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले

अशी आहे प्रस्तावित बस भाडेवाढ

बस/गाडीचा प्रकार – किमी प्रमाणे दर (नॉन-एसी) किमी दर (एसी)
१३ सीटर – लागू नाही – २४ रुपये
१७ सीटर – २३ रुपये – २८ रुपये
२० सीटर – २५ रुपये – ३० रुपये
२७ सीटर – लागू नाही – ५० रुपये
३२ सीटर – ३३ रुपये – लागू नाही
३५ सीटर – ३६ रुपये – ५२ रुपये
४१ सीटर – ४१ रुपये – ६० रुपये
४५ सीटर – ४७ रुपये – ६५ रुपये
व्होल्वो – लागू नाही – ९० रुपये
४९ (३*२) – ४५ रुपये – लागू नाही
५३ (मल्टी) – लागू नाही – ११० रुपये

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल:खासदार अनुराग सिंह ठाकूर

१५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप. पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती,...