पुणे :- डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने (५ जून)नागरिकांना २,००० रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो आहे.
डी. एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के आणि डी. एस. कुलकर्णी डेव्हल्पर्सचे वाइस प्रेसिडेंट मनीष खाडिलकर यावेळी उपस्थित असणार आहेत.
म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे ५ जूनला सर्वांना सायंकाळी ४ ते ६ या वेळेत रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्याम भुर्के यांनी केले आहे.
आपल्या आजुबाजूचा परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

