रिअल इस्टेट विधेयकावर ज्येष्ठ उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
ग्राहकांच्या दृष्टीने हे विधेयक चांगले आहे. ग्राहक फसविला जाणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. त्यामुळे या विधेयकाचे स्वागतच आहे. मात्र, यासंबंधी राज्यात आणि केंद्राचे यापूर्वीचे कायदे आहेतच. रिअल इस्टेट विधेयकाची यात आणखी भर पडली आहे. या विधेयकातील तरतुदी बघता पूर्वीच्या कायद्यांतील तरतुदींचाच भरणा दिसतो. त्यामुळे नवीन एका कायद्याची भर त्यात पडली आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने त्रासदायक आहे. कायदे आणा पण त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम असायला हवी. राज्य सरकारने नुकतीच परवानग्यांची संख्या कमी करू असे सांगितले होते. मात्र, ते कमी न करता त्यात या विधेयकाची भर पडणार आहे. यातील काही तरतुदी चांगल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायातील वाईट बाबींवर अंकुश राहील. कायदे जरुर करावेत परंतु व्यवसाय सुकर होईल यासाठी यंत्रणा चांगली असावी अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन पद्धतीने व्यवहार झाल्यास पारदर्शीपणा येऊ शकतो.

