छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यात शिवक्रांतीची बीजे डाँ जयप्रकाश घुमटकर यांचे प्रतिपादन

Date:

सासवडला छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन संपन्न

सासवड-छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येत असून, शिवक्रांतीची बीजे त्यामध्ये रोवली आहेत. याच विचाराचा जागर घरोघरी होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डाँ.जयप्रकाश घुमटकर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या अकराव्या राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे पार पडले त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डाँ. घुमटकर बोलत होते. तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संमेलनाचे उदघाटन झाले. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील महाराणी येशूबाईंची भुमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्वागताध्य़क्ष शिवाजीराव कोलते, निमंत्रक आत्मारामभाऊ कामथे, राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, संजय सोनवणे, बाळुतात्या यादव, पुरंदरच्या सभापती नलिनी लोळे, सुनील धिवार, नंदकुमार दिवसे आदी उपस्थित होते.
डाँ घुमटकर म्हणाले, पिढ्या न पिढ्या जातिवादी साहित्याची निर्मिती करणारी माणसं समाजात मिरवितात. सत्याचा शोध घेणारी पुरोगामी विचारांची मंडळी मागे राहतात. मानवाचे कल्याण ज्या साहित्यात आहे ते साहित्य सत्याचा शोध घेते. छत्रपती संभाजीराजे यांच्या साहित्यिक कलागुनांची माहिती जनतेपर्यंत गेली पाहिजे.
सरफोजी राजे यांच्या नावाने
तंजावरला साहित्य संमेलन भरविणार

तामिळनाडू (तंजावर) येथे सरफोजीराजे यांच्या नावाने साहित्य संमेलन भरविण्यात येणार असल्याचे य़ुवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाल, मराठी भाषा बोलणारा मोठा वर्ग तंजावरला आहे. संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात मैत्री वाढत जाईल. देशात पहिली मुलींची शाळा सरफोजी राजे यांनी काढली होती. भरतनाट्यम नृत्याचे ते जनक आहेत.
संमेलनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन साहित्यिक व कलावंताचा गौरव करण्यात आला. फुलचंद नागटिळक यांनी एकपात्री नटसम्राट सादर केला. कवी अरुण कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. राज्यभरातून कवि आले होते.
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शिवाजी कोलते, आत्माराम कामथे यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष शामकुमार मेमाणे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

VSR, DGCA ला वाचवण्याचा प्रयत्न:चंद्राबाबू नायडूंचे कंपनी मालकाशी आर्थिक संबंध असल्याचा रोहित पवारांचा आरोप

पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर...

मोदींचे सरकार आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाही शासन एकसारखे

नवी दिल्ली-संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी...

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

मुंबई: दि. २६ फेब्रुवारी २०२६ – सर्वाध‍िक अत्याधुन‍िक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम...