Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोटर वाहन कायदा करताना ड्रायव्हिंग स्कूलला विचारात घ्यावे – महेश झगडे

Date:

पुणे – प्रास्तावित केंद्रीय मोटर वाहन अधिनियम संशोंधन कायदयाचे नियम करताना सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलला विचारात घ्यावे असे मत माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने केंद्रीय मोटार वाहन अधिनियम संशोधन 2021 या मोटार ड्रायव्हिंग स्कूले संदर्भात येणाऱ्या कायद्याच्या संदर्भात परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड म चालक मालक मोटार वाहन संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे तर परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून महेश झगडे (माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन व माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांनी लाभले होते. त्यांनी प्रसंगी राज्यभरातून आलेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार ,कोषाध्यक्ष निलेश गांगुर्डे, विलास शेठ आपटे, पिंपरी-चिंचवड चे अध्यक्ष आनंद कुंभार, पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल कोषाध्यक्ष निखिल बोराडे ,संजय सोनवणे, अनु ज शिंदे, गणेश बाजार,े वीरेंद्र आंब,े टी गणेश पोटे ,वैष्णवी मिश्रा ,शितल कोठारी, महानंदा पन्हाळे, अ पुष्पक किवडकर आदी उपस्थित होते

सुरुवातीच्या सत्रात डॉक्‍टर शिवकुमार राक्षे यांनी अपघात झाल्यावर प्रथम उपचार व जीवन दूत घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली . तर प्रस्तावित कायद्याबद्दल प्रमुख मार्गदर्शन करताना महेश दगडे म्हणाले मी राज्याचा माजी परिवहन आयुक्त म्हणून प्रस्तावित कायद्याबद्दल माझ्या सूचना कळवणार आहे.

एक वाहनचालक म्हणून सुद्धा याबाबतचे माझं मत मी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ऍड हायवे भारत सरकार यांच्याकडे कळवणार आहे. भारत सरकारला अल्ट्रा मॉडर्न ट्रॅक निर्माण करायचे होते तर त्यांनी देशातल्या महानगरपालिकांना सांगून त्यासाठीच्या जागा राखून ठेवायला पाहिजे होत्या.

वाहनांच्या मध्ये होत असलेल्या अत्याधुनिक बदल व ड्रायव्हर लेस वाहन येत आहेत अशा परिस्थितीत मोटर ड्रायव्हिंग स्कुल ने भांडवली गुंतवणूक करावी का ? अशाप्रकारे प्रस्तावित कायद्याचे नियम करताना सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचा या क्षेत्रातील असलेला प्रदीर्घ अनुभव व त्यांना विचारात घेऊन नियमांचा मसुदा केला गेला पाहिजे.

महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने सदर परिषदेमध्ये काही ठराव करण्यात आले. यामध्ये चालक वाहतुकीच्या नियमांची व प्रशिक्षण घेऊन रस्त्यावर येतील म्हणून प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्स सरकार मान्य मोटर स्कूलव्दारे अनिवार्य करा असा ठराव करण्यात आला. तसेच चार चाकी वाहनाच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रत्येक वाहनचालकाने रिफ्रेशर कोर्स करून 5 ए सर्टीफिकेट अनिवार्य करा याची अंमलबजावणी भारत सरकारने त्वरित सुरू करावी असा ठरावही सदर प्रसंगी करण्यात आला.

यावेळी प्रसंगी विवेक खाडे (पनवेल), सुधाकर जाधव, महेंद्र सोनवणे (नाशिक), दिलीप शिंदे (जालना), शिवाजी काकडे (औरंगाबाद) महानंदा पन्हाळे (औरंगाबाद), शितल कोठारी, योगेश खोपकर (बारामती), प्रवीण महांकाळ, दत्तात्रेय ससे (ठाणे), शेख मन्सुर (बीड) साबिर मुल्ला (सांगली), दत्तात्रय इंगळे (अकोला), योगेश पाटील (वसई-विरार), जमील देशपांडे (जळगाव), सुनील चौधरी (धुळे), मोहनीश कुलकर्णी तसेच ठाणे कल्याण पालघर पनवेल सोलापूर अकलूज बारामती पिंपरी चिंचवड पुणे धुळे जळगाव उस्मानाबाद लातूर या ठिकाणचे सरकारमान्य मोटर 272 ड्रायव्हिंग स्कूल संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन निलेश गांगुर्डे यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न होणार

ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू , जागतिक चित्रपट स्पर्धेची यादी जाहीर पुणे, दि. १६ डिसेंबर...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...