पुणे-कोरोना महामारीच्या काळात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सर्व नियम बाजूला ठेवून अनेक चूकीची कामे करून भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ आज पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पार्टी व प्रशासनाने संगनमताने कोविडच्या काळात निविदा न काढता तसेच वाढीव दराने साहित्य खरेदी केले. सन २०२१-२०२२ यामध्ये ५७५ कोटीची फक्त आरोग्य विभागाची तरतूद तसेच वाहतुक विभाग, विद्युत विभाग, क्षेत्रिय कार्यालय व सभासदांच्या स. यादीची तरतूद याचप्रमाणे आमदार, खासदारांचे निधी व पुणे महानगरपालिकेला शहरातून आलेला CSR निधी व साहित्य (बांधकाम उद्योजक क्षेत्र, आय.टी. कंपन्या, सामाजिक संस्था, गणेश मंडळे इ.) असताना कशाप्रकारे महापालिकेने हे खर्च केले याची तपशिलवार माहिती त्यांनी पुणेकरांना द्यायला पाहिजे. तसेच इतक्या शेकडो कोटीचा निधी उपलब्ध असताना काल माहे एप्रिलच्या मुख्य सभेत पुन्हा एकदा कोरोनाच्या नावाखाली २५ कोटी रूपयांचे मोगम वर्गीकरण करण्यात आले आहे. हे कृत्य म्हणजे उघड भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे व झालेल्या कामांचे ठेकेदारांना दुबार बिल देण्याचे षडयंत्र सत्ताधारी व प्रशासन मिळून करीत आहे. कोट्यावधी रूपयांचा खर्च करून देखील २५ कोटी रूपयांचे वर्गीकरण करण्याची काय आवश्यकता आहे. याचे देखील उत्तर सत्ताधाऱ्यांनी व प्रशानसनाने पुणेकरांना दिले पाहिजे. या संदर्भात तातडीने पुणे महानगरपालिकेची मुख्य सभा घ्यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.’’

यानंतर पक्षनेते आबा बागुल व नगरसेवक अरविंद शिंदे यांची भाषणे झाली. यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. आयुक्तांनी शिष्टमंडळाला लवकरच श्र्वेतपत्रिका काढली जाईल. ८ दिवसात सर्व प्रकरणांबद्दल माहिती घेऊन सप्टेंबरमध्ये कोविडच्यासंदंर्भात मुख्य सभा घेतली जाईल असे आश्वासन दिले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, सुधीर काळे, सुजीत यादव, राजेंद्र शिरसाट, विशाल मलके, साहिल केदारी, सोनाली मारणे, सुरेखा खंडागळे, शिलार रतनगिरी, नलिनी दोरगे, द. स. पोळेकर, विश्वास दिघे, भगवान कडू, मेहबुब नदाफ, रवि मोहिते, सचिन आडेकर, सतिश पवार, सुनिल घाडगे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, सादिक लुकडे, अरुण वाघमारे, वाल्मिकी जगताप, विठ्ठल थोरात, विठ्ठल गायवाड, नारायण पाटोळे, रवि मोहिते, राजू शेख, राधिका मखामले, भुषण रानभरे, अजित जाधव, राहुल वंजारी आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

