पुणे- युएसके फौन्डेशन च्या अध्यक्षा डॉ. उषा संजय काकडे यांना आज श्री आदिशक्ती फौन्डेशनच्या वतीने शहीद शिवराम हरी राजगुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ज्येष्ठ व्यंगचित्र कार मंगेश तेंडूलकर आणि डॉ. शरद हर्डीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला . यावेळी डॉ. अजिंक्य पाटील, तुषार देशमुख, प्रेमसुख कटारिया ,डॉ. संभाजी डांगे ,डॉ.नानजीभाई ठक्कर आणि राजेंद्र दीक्षित यांचा हि पुरस्काराने गौरव करण्यात आला . राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यावेळी उपस्थित होते . प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .