Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“डॉ. तात्या लहाने … अंगार… पॉवर इज विदीन” चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

Date:

डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा “डॉ. तात्या लहाने … अंगार… पॉवर इज विदीन” हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो प्रेक्षकांच्या भेटीस १० नोव्हेंबरला येत आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने चला हवा येऊद्या च्या सेटवर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे, विराग मधुमालती वानखडे, वंदना वानखेडे व स्वतः डॉ. तात्या लहाने उपस्थित होते.

या निमित्ताने डॉ. तात्या लहानेनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व त्यावेळी ते म्हणाले “आज मी जिवंत आहे आणि जे आज मी दिवस पाहतोय ते माझ्या आई मुळेच. जर माझ्या आईनी मला तिची किडनी दिली नसती तर मी आजचे हे दिवस पाहू शकलो नसतो. प्रत्येकाची आई आपल्या मुलाला एकदाच जन्म देते पण माझ्या आईनी मला दोनदा जन्म दिला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की डॉक्टरकी हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे त्यामुळे डॉक्टरांनी डॉक्टरकी पेशाला व्यवसाय न समजता ती एक सेवा समजून काम केले पाहिजे, तसेच ते पुढे म्हणाले की आपल्या देशात रक्तदानचा प्रसार झाला आहे पण अजून ही अवयव दानाकडे गांभीर्याने घेतले जात नाही. आज आपल्या देशात अवयवदानाची नितांत गरज असूनसुद्धा अवयव दानाचे प्रमाण बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशात कमी आहे. आपण सगळ्यांनी जागरुक होऊन अवयवदान करून गरजू जनतेचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करावे व त्यांना नवे जीवन द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.”

चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग वानखेडे यांनी चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात सांगितले  की, मी नेत्रदानाच्या जागृतीसाठी “रोशनी जिंदगी में” या अभियानांच्या अंतर्गत अंधव्यक्तीच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तब्बल १०० दिवस स्वतः च्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांची जीवनशैली अनुभवली. ५५५ तास ५ मिनिट ५ सेकंद पर्यंत गाण्याचा विश्वविक्रम करून चीन मधील ४६५ तासांचा गाण्याचा विक्रम मोडून नवा विश्वविक्रम केला व या विक्रमाची नोंद गिनीजबूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. मी ६ दिवस आणि ६ रात्र न जेवता न झोपता १२० तास गाण्याचा विक्रम करून यू. के च्या आयन गिब्सन चा २८ तास आणि २७ मिनिटांचा रेकॉर्ड मोडून नवा विश्व विक्रम केला आणि नेत्रदानाच्या जागृकतेसाठी कलर चॅनल वर १५५ तबला वादाकांसोबत न थांबता सलग १ मिनिट ४५ सेकंद तबला वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड केला.  तसेच मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे यांनी आपापल्या भूमिकांबद्दल सांगून ती भूमिका आपल्याला करायला मिळाली याबद्दल आभार व्यक्त केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून, सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने केलं आहे. सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन-अडीच तासांत अतिशय उत्तमरित्या गुंफला आहे. या सिनेमाचं वेगळेपण रिले सिंगिंग या उपक्रमाने अधिक वाढवलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ गायकांनी सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गात हे गाणे सादर केले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला आहे. ‘काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू’… हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायलं असून ‘एक हिंदुस्थानी’ यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसेच सिनेमातील एका गाण्याला केतकी माटेगावकर हिने देखील आवाज दिला आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या विशेष भूमिका आहेत. सिनेमाचं छायाचित्रण माधवराज दातार यांनी केलं असून, वेशभूषा वंदना वानखडे यांची आहे. तसेच सिनेमाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी समीर-सचिन यांनी सांभाळली आहे.

मसालापटाच्या लाटेत मराठी प्रेक्षक आशयघन विषय शोधू लागले आहेत. अशा चोखंदळ रसिकांसाठी डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा उत्तम पर्वणी ठरणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्णकरून जनसमुदायामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. तात्या लहाने यांच्यावर तयार झालेली “बायोपिक” आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...