‘शाहिरी भीमवंदनेतून’ महामानवाला अभिवादन

Date:

  • शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे डॉ.आंबेडकरांच्या पुणे परिसरातील आठ पुतळ्यांसमोर फिरत्या चैतन्य भीमरथातून पोवाडा कार्यक्रम सादर करुन मानवंदना.

पुणे : जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार … अशा शब्दांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट व त्यांनी दिलेली शिकवण पोवाडयांच्या माध्यमातून सादर करीत शाहिरांनी महामानवाला अभिवादन केले. पुणे आणि परिसरातील विविध आठ पुतळ््यांसमोर चैतन्य भीमरथ या फिरत्या रंगमंचाद्वारे शाहिरी भीमवंदना हा पोवाडयाचा कार्यक्रम सादर करुन अनोखी मानवंदना देण्यात आली. 
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शाहिरी भीमवंदना या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर देवा कांबळे व युवा शाहीर उपस्थित होते. उपक्रमाचे ७ वे वर्ष होते. 
जन्मले भीमराव आंबेडकर, करण्या दलितांचा उद्धार या शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेल्या पोवाडयातून डॉ.आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य शाहिरांनी उपस्थितांसमोर उलगडले. भारताचे थोर शिल्पकार, भीम भास्कर, आंबेडकर वीर, भीमाई जन्म देई, भीम पराक्रमी घडला इतिहास यांसारखे पोवाडे देखील यावेळी सादर झाले. कॅम्प अरोरा टॉवर, अप्पर इंदिरानगर, पद्मावती, सिंबायोसिस सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, दापोडी-बोपोडी या आठ ठिकाणी पोवाडयाचा कार्यक्रम झाला. यामध्ये शाहीर देवराव कांबळे, शाहीर जालिंदर शिंदे, राजकुमार गायकवाड, गोरखनाथ खामकर,अभय भंडारी आदींनी सादरीकरण केले.

* फोटो ओळ : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर देवा कांबळे लोककला मंच तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शाहिरी भीमवंदना हा कार्यक्रम सादर करताना शाहीर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता,विरोध भाषणात पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही

पुणे _महापालिकेतील स्थायी समितीने मुख्य सभेला सादर केलेल्या १५...

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी,...