यशदातीलअधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना राज्यपालांच्या हस्ते शिक्षण व पर्यावरण मित्र पुरस्कार

Date:

पुणे,दि.१२ सप्टेंबर२०२१
यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक योगदानाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण व पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन राजभवनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या औचित्याने राजभवन मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख व प्रसिद्ध समाजसेवक चंद्रकांत शहासने यांनी लिहिलेल्या पर्यावरण विचार या पुस्तिकेचे विमोचन राज्यपालांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील काही मान्यवरांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले .यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांचा समावेश होता.
डॉ.जोगदंड यांनी शैक्षणिक, सामाजिक,प्रशासकीय, पर्यावरण विषयक क्षेत्रात भरीव काम केले आहे.या कामाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण व शिक्षण मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. जोगदंड यांनी शैक्षणिक कार्यातही मोठे योगदान दिले असून त्यांनी अनेकांना शैक्षणिक,स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर पर्यावरण विषयक जनजागृतीसाठीही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत पंधरा विषयात पदव्या संपादन केल्या असून जवळपास आठ विषयांमध्ये प्रमाणपत्र, डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. यशदाच्या
यशमंथन या मासिकाचे ते संपादक आहेत. या माध्यमातूनही त्यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक संस्थांचे १५ हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांना हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनदंन होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिढी घडविण्याच्या कार्यात सहकार्य करा:ॲड. निमल शिर्के-सामंत यांचे नगरसेविकांना आवाहन

पुणे : समाजमाध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग रंगभूमीपासून दुरावत आहे. अशाही परिस्थितीत...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...