प्रिशा शिंदेला दुहेरी मुकुट

Date:

  • मुलांच्या गटात अक्षज सुब्रमणियमला विजेतेपद

पुणे, 22 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला, तर, मुलांच्या गटात गुजरातच्या अक्षज सुब्रमणियम याने विजेतेपद पटकावले.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात गुजरातच्या दुसऱ्या मानांकित अक्षज सुब्रमणियम याने महाराष्ट्राच्या अवनीश चाफळेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. अक्षज हा द न्यू ट्युलीप इंटरनॅशनल शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून साईशा टेनिस अकादमीत प्रशिक्षक देवेंद्रसिंग भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित प्रिशा शिंदे हिने तिसऱ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्यचा 7-5,6-4 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. प्रिशा ही अभिनव इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अर्चित धूत व अर्जुन किर्तने यांनी आकांश सुब्रमणियम व अक्षज सुब्रमणियम यांचा 6-4, 6-7(4), 10-7 असा तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व मेहक कपूर यांनी सिया प्रसादे व देवांशी प्रभुदेसाई यांचा 6-0, 7-6(7-5) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला करंडक, प्रशस्तीपत्रक व 25 एआयटीए गुण, तर उपविजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व 20 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण आणि स्पर्धा संचालक केदार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीए सुपरवायझर रिया चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले:अक्षज सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.अवनीश चाफळे(महा) 6-3, 6-2;
मुली:प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[3] 7-5,6-4;
दुहेरी गट: मुले: अंतिम फेरी:अर्चित धूत/अर्जुन किर्तने वि.वि.आकांश सुब्रमणियम/अक्षज सुब्रमणियम 6-4, 6-7(4), 10-7; मुली: प्रिशा शिंदे/मेहक कपूर वि.वि.सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई 6-0, 7-6(7-5).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...