मुंबई-दूरदर्शन केंद्राच्या कामगारांचा धरणे आंदोलनाचा आज ८ वा दिवस आहे. 140 हंगामी कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कांसाठी केंद्राच्या बाहेर भर रस्त्यावर आंदोलन करत आहेत. निस्वार्थ कामगार संघटनेच्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे .
हे हंगामी कर्मचारी गेले ८- २३ वर्षाहुन अधिक काळ दूरदर्शन मध्ये टेक्निकल स्टाफ, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटिंग, टायपिस्ट, प्रशासन विभाग, अकाऊंटस् डिपार्टमेंट अशी महत्वाची कामे अत्यंत जबाबदारीपुर्वक करीत आहेत.
– महिन्याला ८ असाइन्मेंट आणि फ़क्त ८ दिवसांचे काम असे म्हणत प्रत्यक्षात संपूर्ण महिनाभर ३ शिफ्ट मध्ये काम करून घेतले जाते.
– कुठलाही प्रवास भत्ता नाही, कुठलाही mediclaim नाही, प्रोविडेंट फंड नाही, gratuity, bonus नाही. इतकेच काय महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक अशी मॅटरनिटी लिव्ह सुध्दा दिली जात नाही.
-अगदी लांबून लांबुन म्हणजे विरार,बदलापूर, पनवेल पासून हे कर्मचारी ड्युटीवर येतात. त्यासाठी महिन्याला रूपये 2500-2800 असा खर्च येतो.
– या वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार अत्यंत तुटपुंजा आहे . यांचा घर संसार चालणार कसा? मुलाबाळांची शिक्षण, त्यांची आजारपण कशी निभावत असतील? याचा विचार वारंवार सांगून लिहूनही सरकार करीत नाही.
– दिल्लीपर्यंत जाऊन प्रसार भारतीचे मंत्री, CEO, ADG यांच्याबरोबर मिटिंगस घेतल्या, निवेदने दिली. नुसत्या पोकळ अश्वासनांखेरीज पुढे काहीच झालेले नाही. खूप वाट पाहून शेवटी नाईलाजाने कर्मचाऱ्यांना हे संपांचे ,आंदोलनाचे अस्त्र उचलावे लागले.
भर रस्त्यावर अत्यंत तळपत्या उन्हात हे कामगार मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.
कामगारांच्या मागण्या अतिशय साध्या आहेत.
-दिल्लीतील मिटिंग मध्ये आश्वासने दिल्याप्रमाणे 30 जून 2019 पर्यंत Policy draft करून हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करन्यात यावे.
-त्यासाठी सांगितल्या प्रमाणे कमिटी नेमून काम करण्यात यावे.
-कर्मचाऱ्यांची पगारवाढ कालनिहाय महागाई नुसार करून त्याची व्याप्ती Pan India स्तरावर करावी.
– नियमानुसार भत्ते, फ़ंड, grauity, बोनस, ओव्हर टाईम, सुट्या इ. देण्यात याव्यात.
अशी कामगारांची मागणी आहे.
सरकारने, प्रसार भारती आणि संबंधित अधिकारी वर्गाने त्वरित याची नोंद घ्यावी आणि ताबडतोब सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी कळकळीची विनंती आहे. मागण्या मान्य होई पर्यंत हा कामबंद लढा असाच सुरू राहील असे निस्वार्थ कामगार संघटनेच्या अंजली दमानिया यांनी जाहीर केले आहे.