दुखणं अंगावर काढू नका!

Date:

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश.

श्री. शांतिलालमुथ्था: हृदयविकार, मेंदूविकारक्षयरोग हे गंभीर आजार दीर्घकालीन असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त १५ दिवसांचाच आहे. या काळात व्यवस्थित काळजी घेतली त्यातून रुग्ण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. काही लोकं चाचणी न करता आजार अंगावर काढतात. या संदर्भात आपण नागरिकांना काय सांगाल ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बिड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे. आपण ॲॅनॅलिसीस केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तात्काळ करता येतो. बऱ्याचदा हॅपी हायपोक्सिया किंवा सायलेंट हायपोक्सिया  आपण म्हणतो. बऱ्याचदा एखादी व्यक्ती नॉर्मल असते परंतु त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते ते लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

श्री. शांतिलालमुथ्था: एखादी व्यक्ति कोरोनामुळे दाखल झाल्यानंतर १-२ दिवसात त्या व्यक्तीला सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी घरी जाऊन स्वतःला विलग करण्याच्या सूचना डॉक्टर देतात. मात्र १४ दिवससुद्धा पूर्ण झालेले नसताना हॉस्पिटलने सोडले म्हणजे आपण मोकळे झालो असे समजून समाजामध्ये सर्रासपणे वावरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. साधारणतः त्या रुग्णाने किती दिवस बाहेर पडू नये यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना काय आहेत ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : साधारणपणे कोरोना विषाणूचा इनक्युबेशन पिरिअड  १४ दिवसांचा आहे. एखाद्याला संसर्ग झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवसापर्यंत लक्षणे दिसतात. असिम्प्टोमॅटीक असेल तर दहाव्या दिवसापर्यंत व्हायरल लोड कमी होऊ शकतो. परंतु दहाव्या दिवसानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर चार दिवस आपण होम क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. शेवटी याचा प्रसार टाळायचा असेल तर आपण “दो गज की दूरी” ठेवणे आवश्यक आहे.

श्री. शांतिलालमुथ्था: क्वारंटाईनहोम क्वारंटाईनइन्स्टिटयूशनल क्वारंटाईन याबाबत आपण मार्गदर्शन करावं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : एखादी व्यक्ती बाहेर फिरून आला कुठून तरी इन्फेक्शन घेऊन आला व पॉझिटिव्ह झाला तर आपण “थ्री टी” प्रिन्सिपलप्रमाणे पहिल्यांदा त्या व्यक्तींचे ट्रेसिंग करतो. या व्यक्तीमुळे जे कुटुंबातील सदस्य असतात ते हाय रिस्क मध्ये येतात. हि व्यक्ती जिथे जिथे संपर्क करून आलेली असेल तिथल्या व्यक्तींना आपण लो रिस्क म्हणतो म्हणजे जिथे कमी काळ  संपर्क झाला. हाय रिस्क आणि लो रिस्क मिळून किमान दहा-पंधरा लोकांचे तरी आपण ट्रेसिंग केले पाहिजे व त्यांच्यावर ट्रॅकिंग ठेवले पाहिजे.

दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं  राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे  मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. यासाठी आपण त्रिस्तरीय हॉस्पिटल्स केलेत.

एक म्हणजे कोवीड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) आणि तिसरं डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल (डीसीएच). रुग्ण पॉझिटिव्ह आहे परंतु लक्षणे नाहीत त्यांना आपण सीसीसीमध्ये ठेवतो. बरेच लोक  म्हणतात, माझा बंगला आहे, माझा मोठा फ्लॅट आहे, मला काही लक्षणे नाहीत. अशा वेळेस मी माझ्या घरीच थांबेल. मुख्यत: संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टी आहेत, एवढाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे.

श्री. शांतिलालमुथ्था: होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर किंवा राहत असताना प्रत्यक्षात कुठल्या प्रकारची खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहायचे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यायची. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने  राहणे सुरक्षित आहे.

श्री. शांतिलालमुथ्था: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा कोविड केअर सेंटरची संख्या किती व त्याच्यामध्ये किती लोकांना ठेवता येऊ शकते ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. राज्यात साधारण २००० असे सेंटर्स आहेत. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये कितीतरी कोविड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत. आजच्या घडीला आपल्याकडे दीड लाख रुग्ण आहेत. परंतु अडीच लाखांच्यावर आपल्याकडे सीसीसीचे बेड्स आहेत. यामध्ये  ऑक्सिजनची सोय नसलेले बेड्स, ऑक्सिजनची सोय असलेले बेड्स, आयसीयू  बेड्स आणि व्हेंटीलेटर्स असलेले आयसीयू बेड्स अशा बऱ्याच कॅटेगरी केल्या आहेत.

आता जम्बो फॅसिलिटीज म्हणजे एका जागेवर १०००-२००० बेड्स असतात. त्या प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय असते. ठराविक वॉर्डमध्ये डॉक्टर्स असतात. जेवणाची उत्तम व्यवस्था असते. स्वच्छ स्वच्छतागृह असतात. सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. काढा, हळदीचे गरम दूध पौष्टिक जेवण दिले जाते. प्रतिकारशक्ती वाढावी या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये, सगळ्या सीसीसीच्या सेंटरमध्ये, उत्तम पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून कोरोनावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतलीच पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, तिचा मुलगा जो ८० वर्षांचा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. म्हणजे १०७ वर्षाची महिला सुद्धा कोरोनावर मात करू शकते. गरज आहे आपल्या मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याची.

  • मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारित होत आहे.
  • शक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज
  • शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी कोरोनासह जगण्याची तयारी
  • रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व
  • सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्काऊट क्रीडांगणावर मल्लखांब प्रात्यक्षिकांतून सुदृढ शरीर संपन्नतेचा संदेश 

श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे आयोजन ; स्व-रूपवर्धिनी च्या...

मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका; ठाकरे बंधूंच्या युतीचे केले स्वागत

मुंबई-महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला...

विद्यार्थ्यांना विद्यार्जन बरोबरच कलागुणांना वाव देणे गरजेचे – पोलिस अधीक्षक तानाजी चिखले

पुणे: पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संत तुकाराम इंग्लिश...

‘धुरंधर 2’; पाच भाषांमध्ये होणार मेगा पॅन-इंडिया रिलीज

हिंदीत प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारी धुरंधर आता...