पुणे- संपूर्ण देशाच्या हितासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपाला रोखणे जरीरीचे असल्याने कॉंग्रेसच्या मित्रपक्षांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी कोणत्याही स्तरावर जवळीक साधू नये असा सल्ला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आज कॉंग्रेसच्या प्रभारी सोनाल पटेल यांनी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे . अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी तथा महाराष्ट्र प्रभारी श्रीमती सोनल पटेल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अत्याधुनिक कार्यालय बघून श्रीमती सोनल पटेल यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी चहापानासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी विचारधारा समान असून तिच्या रक्षणार्थ प्रयत्न व्हावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. जातीयवादी धर्मांध शक्तींना थोपवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी इच्छा श्रीमती सोनल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या महासचिव संगीतातिवारी उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जवळीक नको -सोनल पटेल यांचा राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षांना सल्ला
Date: