पुणे: पर्यटन खात्याच्या साहसी पर्यटन उपक्रम नियमावलीत साहसी पर्यटन आणि साहसी क्रीडा प्रकार यात गल्लत करण्यात आली आहे, ती दूर करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत आमदार शिरोळे यांनी गुरुवारी सकाळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाच्या २०१२च्या क्रीडा धोरणानुसार गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळ हे क्रीडा प्रकार म्हणून शासनमान्य आहेत. त्यांचा वर्गीकरण क्रीडा खात्याच्या अखत्यारीत येते. पर्यटन खात्याने प्रस्तावित केलेल्या जी.आर. मसुद्यात साहसी क्रीडा प्रकार आणि साहसी पर्यटन यात गल्लत करण्यात आली आहे.ती दूर करून साहसी क्रीडा प्रकार क्रीडा खात्याकडे ठेवावा आणि साहसी पर्यटन हा विषय पर्यटन खात्याकडे वर्ग करावा, असे आमदार शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे याबाबतचे निवेदनही पर्यटनमंत्र्यांना स्पष्ट केले. आणि या मागणीचा विचार करून पर्यटन खात्याच्या प्रस्तावित जी .आर. मध्ये सुधारणा कराव्यात असे सांगितले.

