मुंबई : १५ दिवसात पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होतील, स्वतंत्र पणे भाजपचे सरकार स्थापन करतील आणि बंडखोर सारे अपात्र होऊन घरी बसतील असा अंदाज काहीजण व्यक्त करत असताना फडणवीसांवर अजिबात विश्वास ठेऊ नका असे आवाहन अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना केले आहे .
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर “देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका” अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. फडणवीस धोका देतात त्याच्यावर विश्वास ठेऊ नका असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजपने महाविकास सरकारच्या बहुमत चाचणीसाठी मागणी केल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित फडणवीसांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे.

