गाफिलपणा नको ,लसीकरणासाठी पूर्णतः सुसज्ज तयारी करा -विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ

Date:

पुणे- या वर्षात झाली ती दिरंगाई पुरे आता तरी शहाणे व्हा ,आणि अजिबात गाफिलपणा न करता संपूर्ण पुणे शहराच्या लसीकरणासाठी पूर्णतः सुसज्ज अशी तयारी करा ,अजिबात नागरिकांना त्रास होणार नाही, सारे काही सुरळीत ,सहज पार पडेल असे नियोजन करा अशा स्पष्ट सूचना महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत .

देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना 1 मे पासून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. पुणे शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. मात्र, पुण्यातील लसीकरण मोहिम पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा आरोप पुणे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

पुण्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहे. 4-5 तास थांबले तरी लस मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने नुकतेच 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याची मोहिम 1 मे पासून सुरु केली आहे. मात्र, पुणे शहरात लसीकरणा मध्ये अनेक त्रुटी असून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिपाली धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरणाबाबत उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा लसींचा साठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी लसीकरण केंद्र उभारावे लागतील. नवीन केंद्र सुरु करताना आवश्यक स्टाफ व सामग्री लागणार आहे. याची पुर्तता देखील करावी लागणार आहे. तसेच आवश्यक स्टाफ यामध्ये नर्सेस, डॉक्टर्स, परिचारीका व गार्डस यांची नेमणूक करावी लागणार आहे. आवश्यकता भासल्यास भरती करावी. या सर्व उपाययोजना वेळेत कराव्यात. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल आणि नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल, असे निवेदनात दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...