ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली- ‘आम्ही तुम्हाला उध्वस्त करू’

Date:

वॉशिंग्टन: वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी यावेळी थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली आहे तुर्कीने जर सीरियाप्रकरणी मर्यादांचे उल्लघन गेले तर तुमची अर्थव्यवस्था नष्ट करेन. याआधी ट्रम्प यांनी तुर्कीच्या सीमेवरून अमेरिकेचे सैन्य हटवले होते. तुर्कीमधील सध्याच्या परिस्थितीचा सामना त्यांनाच करावा लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

तुर्कस्तानाला धमकी देताना ट्रम्प यांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, मी याआधीही स्पष्ट केले आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की तुर्कीने असे काही केले जे माझ्या दृष्टीने मर्यादांचे उल्लंघन ठरणारे असेल तर मी अर्थव्यवस्था नष्ट करून टाकेन.

काय आहे तुर्क विरुद्ध कुर्द संघर्ष

कुर्द लोकांनी ISISविरुद्धच्या दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची मदत केली होती. पण तुर्की त्यांना दहशतवादी असल्याचे मानतात. तुर्कीत असलेल्या दहशतवादी संघटनांना कुर्दांची मदत असते. यामुळेच कुर्द लोकांविरुद्ध तुर्कीने युद्धाची तयारी केली आहे. आता सीरियाच्या सीमेवरून अमेरिकेने सैन्य हटवल्यामुळे तुर्क आणि कुर्द यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....