महाराणा प्रताप जयंतीनिमित्त डॉक्टरांचा सन्मान-

Date:

पुणे : अखिल भारतीय राजपूत (बलवार) समाज, पुणे व पतित पावन संघटना पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त पूर्व भागात कोरोना काळात २४ तास पूर्ण वेळ देऊन कर्तव्यरूपी कार्य करणा-या वेदांत क्लिनिकचे डॉ.जयवंत सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 
गुरुवार पेठेत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू जागरण प्रमुख संजय चतुर, उमेशअण्णा चव्हाण, राजाभाऊ पाटील, स्वप्नील नाईक व राजू परदेशी यांच्या हस्ते हा सन्मान झाला. यावेळी संदीप गायकवाड, किशोर रजपूत, राजू परदेशी, अमित कंक, प्रणव गंजीवाले, मनोज पवार, संतोष शेंडगे, ललित खंडाळे, गुरु कोळी, योगेश वाडेकर, यादव पुजारी, शुभम कोष्टी, मंगेश शिंदे, सुनील तांबट, विजय रजपूत, आशीष रजपूत, निखिल बलवार, सचिन बलवार, प्रसाद रजपूत, तेजस रजपूत, ओमकार रजपूत, सागर बलवार, पीयूष राजपूत, विनीत रजपूत, राज रजपूत, अभिषेक रजपूत, अनिकेत रजपूत, निर्मला रजपूत, शिल्पा बलवार आदी उपस्थित होते. 
स्वप्नील नाईक म्हणाले, वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांनी युद्धभूमीवर पराक्रम गाजवून शत्रूचा नायनाट केला. त्याप्रमाणे कोविडच्या काळात कोरोनारुपी शत्रूला हरवून सामान्यांना जीवन देण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे. डॉ. जयवंत सूर्यवंशी यांनी ३५०० ते ४००० नागरिकांना कोव्हीड पासून अल्प दरात उपचार देऊन जीवनदान दिले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. कार्यक्रमाचे आयोजन जय महाराणा ग्रुप चे राजाभाऊ राजपूत, अमित राजपूत, रोहित बलवार,सतीश बलवार, गणेश सावरकर यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...