डॉक्टर्स डे च्या दिवशीच नवविवाहित डॉक्टर दांपत्याची पुण्यात आत्महत्या

Date:

पुणे: वानवडी येथील आझाद नगर मधील नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आज डॉक्टर्स डे साजरा होत असतानाच ही घटना घडल्यानं परिसरात व पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय २६) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २८ रा. आझाद नगर, वानवडी ) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगर इथं राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिता यांची क्लिनिक आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. काल रात्री घरी परतत असताना दोघांमध्ये फोनवर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास निखिल घरी पोहोचले तेव्हा अंकिता घरातील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. डॉक्टर अंकिता यांनी गळफास घेतल्याची माहिती वानवडी पोलिसांना   देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर अंकिता यांचा मृतदेह त्यांच्या ऊरुळीकांचन येथील माहेरी नेण्यात आला. पत्नीनं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं डॉ. निखिल यांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंख्याला गळफास लावून घेतला. डॉक्टर निखिलच्या आत्महत्येची खबर मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसांपासून दोघेही मानसिक त्रासात होते त्याचप्रमाणे दोघांमध्ये मतभेद सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वानवडी पोलिसांकडून दोघांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...