पुणे- कात्रज ते कोंढवा रस्त्याचं रुंदीकरण अखेर मार्गी लागतंय , येवलेवाडी चा आराखडा झाला … पण आता येथे या भागासाठी केलेल्या रिठे माळ येथील जवळ जवळ पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचं काम केवळ किरकोळ इनलेट,आऊटलेट,प्लास्टर अशा गोष्टींसाठी रखडवून ठेऊ नये अशी विनंती वजा कैफियत आज कात्रजचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी येथे मांडली .
ते म्हणाले , या भागात झपाट्याने प्लॉट खरेदी विक्री ,आणि मोठ मोठी बांधकामे उभी राहत आहेत ,राहिली आहेत , वाहतूक वाढली, लोकसंख्याही खूप वाढली. सध्या ज्या केदारेश्वर च्या टाकीतून पाणीपुरवठा होतो ,त्या टाकीला पाण्याची उपलब्धता कमी पडते आहे. वडगाव जलकेंद्रातून कात्रज येथे व तेथून या ठिकाणी पाणी येते . विजेचा लपंडाव व अन्य कारणाने येथे पाण्याची कमतरता भासते .आणि वाढणारी वस्ती पाहून गेल्या ३ वर्षापूर्वीच येथे आणखी टाक्या उभारण्याचे काम भारती कदम नगरसेविका असताना सुरु करण्यात आले . आता या म्हणजे रीठेमाल येथील 1 कोटी लिटर क्षमतेच्या टाकीचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले आहे . किरकोळ कामे राहिली आहेत .ती तातडीने पूर्ण करून घ्यावीत . टाकीचे काम रखडले तर काही महिन्यातच येथे पाण्याची समस्या उग्र रूप धरण करू शकते . तेव्हा महापालिका प्रशासनाने तातडीने या सर्वाधिक आवश्यक बाबी कडे लक्ष देऊन या नव्या टाक्यांचे काम पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात अशी मागणी प्रकाश कदम यांनी केली आहे …. पहा हा त्याबाबतचा व्हिडीओ रिपोर्ट
पाण्याच्या टाकीचं काम आता रखडवू नका हो :प्रकाश कदम (व्हिडीओ)
Date:

