रेमडेसिवीर इंजेक्शनची महाराष्ट्रातून निर्यात होऊ देऊ नका – आबा बागुल

Date:

पुणे- नफेखोरीसाठी कोरोना महामारीच्या काळातही काही कंटक सरसावले असून रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करूनही पैसे कमविण्याचे कारस्थान होत आहे त्यामुळे तातडीने महाराष्ट्रातून या इंजेक्शनची निर्यात होणार नाही अशा पद्धतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी करणारे निवेदन महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

या पत्रात आबा बागुल यांनी असे म्हटले आहे कि ,’कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा बऱ्यापैकी उपयोग होत आहे. हे आता सिद्ध झाले आहे. मात्र त्याची उपलब्धता अतिशय दुर्मिळ झाली असून अनेक ठिकाणी हे उपलब्ध नाही असे सांगितले जाते. वास्तविक अधिक पैसे घेऊन त्याचा काळ बाजार करून हे केमिस्ट व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले जाते. याला पायबंद तर घातलाच पाहिजे. याच बरोबर आता महाराष्ट्र शासनाने याच्या किमतीवर नियंत्रण घातले. कमाल मर्यादा घातली त्यामुळे या कोरोना विषाणूच्या काळात वैयक्तिक स्वार्थापोटी फायदा घेण्यासाठी अनेक डीलर हे आता निर्यातीकडे वळाले आहेत. वास्तविक आपल्या महाराष्ट्रात याची फार मोठी गरज असताना हे परदेशी पाठवणे अत्यंत चुकीचे असून याला देखील पायबंद घातलाच पाहिजे आणि ते देखील परदेशी निर्यातीला महाराष्ट्रातून निर्यात होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच केंद्र सरकारने देखील देश व्यापी पातळीवर निर्यात होणार नाही. व ते देशातच उपलध होईल यासाठी तातडीने कार्यवाही केली पाहिजे. आपणांस विनंती की , आपण महाराष्ट्र पातळीवरती याच्या निर्यातीवर बंदी घालावी तसेच केंद सरकारने देखील बंदी घालावी यासाठी केंद सरकारला पत्र व्यवहार करून आवाहन करावे व विनंती करावी, अशी विनंती मी आपणांस करतो. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...