पिंपरी :
कै. संजय बिरू दुधभाते प्रतिष्ठानच्यावतीने पिंपळे निलख येथे अखिल महाराष्ट्र मुष्टीयोद्ध असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुष्टीयोद्ध स्पर्धेत पिंपरीमधी ल यादव स्पोर्ट़ क्लबला विजेतेपद व सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धा म्हणून प्रथमेश बाईत यास गौरविण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अजय दुधभाते यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना अखिल भारतीय रामोशी समाजाचे अध्यक्ष दिपक माकर व क्रीडा संघटक राकेश सौदाई यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी तानाजी काटे, वसंत मोरे, योगिनी निंबाळकर, मिलिंद पोत्रे,रवि बालवडकर, रमा मंजाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे व आभार सोमनाथ मसुडगे यांनी मानले.
-स्पर्धेतील रोमांचक लढती-
अजय देशमुख वि.वि.प्रशांत शहा
शिव मारी वि वि गणेश भालचिम
श्रेयश बालघरे वि वि ओम बोधे
आदित्य देशमुख वि वि यश तांबे
रविंद्र रत्नपारखी वि वि मोहसिन शेख
राज रणसुंभे वि वि विवेक जोशी
जनार्दन नाईक वि वि रफिक सय्यद
राजु कांबळे वि वि सिद्धार्थ गायकवाड
जुनेज शेख वि वि राकेश शहा
प्रथमेश बाईत वि वि संकल्प परदेशी
श्रुषिकेश किंडरे वि वि सार्थक शिवले
अर्थव शिवले वि वि प्रणव शहा

