आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह; पण श्रेयासाठी राजकीय जल्लोष चुकीचा : राम जाधव

Date:

पिंपरी-
मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, मराठा आरक्षण मिळावे, यासाठी तब्बल 42 लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. तसेच कोपर्डीमध्ये नराधमांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरलेल्या छकुलीच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत सामाजिक भान बाजूला ठेवून राजकीय श्रेयासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे, हे चुकीचे आहे, अशी टीका छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी केली.
          मराठा समाजाला खर्‍या अर्थाने आरक्षणाची गरज होती. मराठा समाज पिढ्यान्पिढ्या शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. 90 टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षणाची गरज होती. अधिवेशनापूर्वीच आरक्षणावर निर्णय होणे अपेक्षित होते. तसे झालेही. परंतु आरक्षणाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी मोठा जल्लोष सुरू आहे, तो चुकीचा आहे.
          मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील मराठा समाज बांधवांनी आत्महत्या करीत स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले,  त्या बांधवांप्रति जल्लोष करणाऱ्या राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहे. आरक्षण मिळाल्यानंतर विजयोत्सव साजरा करणे अपेक्षित नव्हते आणि नाहीच. अशा घटना घडल्या असताना केवळ ‘आम्ही केले’, हे दाखवून राजकीय श्रेय लाटण्यासाठी चाललेला विजयोत्सव म्हणजे सामाजिक संवेदना हरविल्याचा हा प्रकार आहे. या विजयोत्सवाची खरंच गरज होती का ? असा प्रश्न निर्माण होतो. ही समाजासाठी चिंताजनक बाब आहे, असे राम जाधव यांनी सांगितले.
       ज्या गावातून आंदोलनाला सुरुवात झाली, त्या कोपर्डीत एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्यात आले. हीच मुलगी मराठा आरक्षण आंदोलनाची प्रेरणास्त्रोत होती. अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणीही राम जाधव यांनी केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारापूर्वी पुण्याच्या Golden King ला मागितली होती 5 कोटीची खंडणी

शेट्टी गोळीबार ;सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर...

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...