सारा सिटीच्या राजाची जल्लोषात प्रतिष्ठापना
पुणे-चाकणमधील सारा सिटी फेज डी सहकारी गृहरचना सोसायटीच्या गणरायाची जल्लोषपूर्ण, भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड, खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे आहेत.
येथे महाराष्ट्रीयनां सोबतच प. बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम आदी भागातून रोजगारासाठी आलेली कुटुंबे एकोप्याने राहायला आहेत. दरवर्षी गणेशोत्सव जात, धर्म, प्रदेश बाजूला ठेऊन मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. सोसायटीच्या या गणेशोत्सवात मनोरंजन, माहितीपर, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. यंदाही भजन, कीर्तन, होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, गायन, डान्स स्पर्धा, खो खो स्पर्धा आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.