चाकण / प्रतिनिधी:सारा सिटी फेज डी सहकारी गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्यावतीने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खराबवाडीचे सरपंच सागर खराबी, सारा सिटीचे सेल्स मॅनेजर विजय जाधव, फेज बी सहकारी गृहनिर्माण सहकारीचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी येळवंडे, फेज ए’चे नियोजित अध्यक्ष झाकीर तांबोळी, खराबवाडीचे पोलीस पाटील किरण किर्ते, उद्योजक भगवान चौधरी, योगेश टेकाळे, सोसायटीचे खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे, सर्वेष पोरे, शंकर जाधव, सोमनाथ पाटोळे, प्रमोद टेकाळे, रमेश गोमकाळे, अमोल शिंदे, शरद जागुष्टे, राम कदम, कलाप्पा सुतार, चेतन चव्हाण, राहुल शेटे, लहु काकडे, आदित्य राघव, ज्ञानेश्वर करपे, प्रकाश लोखंडे, अंजन महाराणा, जितेंद्र बोरसे, सुब्रमन्यम तेवर, निलेश गोरीवाले, नितीन पडवळ, प्रकाश कुलकर्णी, विजय चौंडणकर, अरुण चव्हाण, रणजेत चौधरी, दीपक पाटील, निलेश गुरव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षारक्षकांच्या संचलनाने झाली. ध्वजवंदन, प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी बालचमूंच्या सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विविध देशभक्तीपर गीते, हिंदी-मराठी चित्रपटातील गीते, तसेच नृत्ये बालचमूंनी सादर केली. त्याला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

