Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिवाळी अंक हे मराठी भाषेचं लेणं – विश्वास पाटील

Date:

नवी दिल्ली : मराठी साहित्याची परंपरा मोठी असून यामध्ये  दिवाळी अंक मराठी भाषेचं लेणं ठरले आहे.  याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी काढले. 

            महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. पाटील यांचे स्वागत शाल, रोपटे आणि दिवाळी विशेषांकाचा संच भेट देऊन  केले.  यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी यांच्यासह कॅनडा राजदूत कार्यालयाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा लेखिका अर्चना मिरजकर उपस्थित होत्या.

            श्री. पाटील म्हणाले, मराठी वाचक चोखंदळ असून तो अस्सल, दर्जेदार वाचन साहित्याला मान देतो. या वाचनाला दिवाळी विशेषांकांची जोड हा वाचकांसाठी तसेच लेखकांसाठी विशेष देणे आहे. दिवाळी विशेषांक हा कैवल्याचा आनंद देत असून या माध्यमातून लेखक, चित्रकार, पत्रकार घडत असतात. दिवाळी विशेषांकांची परंपरा ही दुर्गा पूजानिमित्त बंगालमध्ये सुरू झाली. ती मराठी लेखकांनी दिवाळीनिमित्त शंभर- सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केली. आज ही परंपरा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून अधिक वृद्धिंगत होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

            परिचय केंद्र दिवाळी अंकांचे विशेष प्रदर्शन राजधानी दिल्लीत आयोजित करीत असल्यामुळे येथील मराठी वाचकांसाठी, पत्रकारांसाठी, संसद सदस्यांसाठी ही पर्वणी ठरत असल्याचे श्री. पाटील  म्हणाले.

            विश्वास पाटील हे सिद्धहस्त कादंबरीकार असून ते भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. पानिपत, झाडाझडती, संभाजी, महानायक अशा सरस, वाचनप्रिय ऐतिहासिक तसेच सामाजिक भान असणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कादंबऱ्या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. झाडाझडती या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी पानीपत कादंबरी लिहितांना दिल्ली, हरियाणा आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खाणाखुणांच्या आठवणींना  उजाळा दिला.

            श्री. पाटील लिखित  ‘शिवाजी महासम्राट कांदबरी’चा  पहिला खंड  इंग्रजीमध्ये वेस्टलँड प्रकाशनाने  मंगळवारी प्रकाशित केला.

आजपासून ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन वाचकांसाठी खुले

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकित प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचे 90 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये थिंक पॉझिटिव्ह,  महाराष्ट्राची जत्रा, किशोर, कालनिर्णय, दिवाळी आवाज, मिळून साऱ्याजणी, तारांगण, माहेर, मार्मिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, लोकप्रभा, मिडिया वॉच, लोकमत दीपोत्सव, चपराक, उत्तम अनुवाद, गोंदण, शब्दगांधार, प्रतिबिंब, कथाश्री, अनघा, किल्ला, अक्षरभेट, अलका, ऋतुरंग असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे.  हे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू:शेतात खेळत असताना आई-वडिलांसमोरच ओढून नेले

शिरूर-जुन्नर सीमेवरील पारगावमधील घटना पुणे- जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या...

पुण्या पिंपरीत महायुती नाही, अजित पवार भाजपा विरोधात लढणार – मुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे- महापालिकेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन...

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला:मुंबईसह 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई:राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. त्यात...

आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा भडिमार:यादी दुरुस्त करा, मगच तारखा जाहीर करा

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक...