मुंबई – दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि समोर बसलेले रसिक प्रेक्षक त्यांना दाद देतात तेव्हाच त्यांना प्रोत्साहन मिळते. रसिकांना कलाकरांच्या कलेचा आनंद उपभोगता येतो. अशी ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर करते. यामुळेच दिवाळी आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण देत असते असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.
भाजपा मागाठाणे विधानसभा व वीर सावरकर नगर याच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, संगीतकार अवधूत गुप्ते, संगीतकार अमोल बावडेकर, वादक तुषार देओल, अभिनेत्री माधवी जुवेकर, अभिनेत्री स्वाती देओल,अभिनेता स्वप्नील जोशी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई भाजपा सचिव विनोद शेलार, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेविका आसावरी पाटील, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला मंडळ अध्यक्षा रश्मी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरेकर पुढे म्हणाले की, दिवाळी पहाटसाठी सर्व प्रेक्षक सकाळपासून आवर्जून उपस्थित असतात. दिवाळी पहाटच्या मैफीलीत उपस्थित कलाकार इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन देतात असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगतिले ते पुढे म्हणाले की, गेली बारा-तेरा वर्षे झाली न चुकता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिवाळी आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण देत असते. आयुष्यातील अंधकार दूर करण्याचे काम दिवाळी करत असते. आपल्या विभागातील लोक मोठे कलाकार आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो, असे दरेकर यांनी सांगितले.
मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता असलो तरीही माझा जीव मागाठाणेतील जनतेच्या प्रश्नांशी निगडित आहे. कोणत्याही प्रकारचे प्रश्न असले तरी मी जातीने त्याकडे पाहतो. आज रंगभूमी दिवस आहे त्यामुळे कलाकारांचाही वेळ खूप महत्त्वाचा आहे. कोविडच्या काळात गेली दोन वर्ष कलाकार घरात बसून आहेत. कलाकारांच्या कार्यक्रमाचा प्राण प्रेक्षक आहेत. कलाकारांना प्रेक्षक प्रतिसाद देतात म्हणून कलाकारांनाही आपली कला दाखविण्यासाठी प्रोत्साहन मिळते असेही त्यांनी सांगितले.
दिवाळी आयुष्याला एक वेगळे वळण देते-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Date:

