पुणे- सहकारनगर-पद्मावती प्रभागातील नगरसेवक महेश वाबळे यांनी आज आपल्या प्रभागातील काही शाळांमध्ये जाऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साहित्याचे वाटप केले.
यावेळी वाबळे म्हणाले ,’ आज जगभरात थैमान घातलेल्या करोनामुळे शाळा बंद झाल्या होत्या. आता त्या पूर्ववत होत असताना शाळांमध्ये विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली आहे.शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे. आज स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनाचे औचित्य साधून माझ्या प्रभागातील श्री अरण्येश्वर विद्या मंदिर, विद्या विकास विद्यालय,मुक्तांगण इंग्लिश मिडीयम स्कूल व ल. रा. शिंदे हायस्कूल, चाटे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांना ऑक्सीमिटर, थर्मामीटर, मास्क व सनिटायजर या वैद्यकीय वस्तूंचे वाटप सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब दुमे, विनायक जांभूळकर, सुभाष जिरगे, फुलचंद चाटे व स्वराज्य प्रतिष्ठान चे सदस्य विजय रंगापुरे, सुनील बिबवे, भीमा आवळे राम बोराडे तसेच शाळेचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य प्रतिष्ठान व नगरसेवक श्री महेश वाबळे यांनी केले होते .

