केन्द्राने टप्पा – एक ते पाचमधे अन्न अनुदाना अंतर्गत अंदाजे 2.6 लाख कोटी रुपये किमती इतके एकूण सुमारे 759 लाख मेट्रीक टन अन्नधान्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले
नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की, 31 जानेवारी 2022 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे 50.38 लाख मेट्रिक टन अन्नधान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम-जीकेएवाय) अंतर्गत टप्पा 5 मध्ये वितरीत करण्यात आले आहे. पीएम-जीकेएवाय अंतर्गत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थी समाविष्ट आहेत. त्यांच्या मासिक एनएफएसए अन्नधान्यांपेक्षा आणि त्याहून अधिक दरमहा 5 किलो प्रति व्यक्ती या प्रमाणात अतिरिक्त मोफत अन्नधान्य प्राप्त करण्यास पात्र आहेत.
दरम्यान, पीएम-जीकेएवाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी, देशात कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यापासून, म्हणजे टप्पा – एक ते पाचमधे, अन्न अनुदाना अंतर्गत अंदाजे 2.6 लाख कोटी रुपये किमती इतके एकूण सुमारे 759 लाख मेट्रीक टन अन्नधान्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विभागाने वितरित केले.