चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून १७ हजार ५०० राष्ट्रध्वज वाटप

Date:

पुणे-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगाचा संकल्प केला असून, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मतदारसंघात १७ हजार पाचशे राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’चा संकल्प केला आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून; स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या जवानांना स्मरण करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या घरावर राष्ट्रध्वज लागला पाहिजे, यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आग्रही असून, त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास १७ हजार पाचशे राष्ट्रध्वजाचे वाटप केले आहे‌. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी आणि सोसायटीमध्ये जाऊन राष्ट्रध्वाजाचे वाटप केले. तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरी राष्ट्रध्वज लावण्याचा आग्रह धरला.

दरम्यान, हर घर तिरंगासाठी भाजपा कोथरूड मंडलाच्यावतीने उद्या दि. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीत नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सहभागी होऊन सर्व कोथरूड करांना हर घर तिरंगासाठी आवाहन करणार आहेत.

दुपारी ४ वाजता. कोथरूड मतदारसंघातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही रॅली सुरु होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कोथरूड मंडल भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...