देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पायऱ्यांवरच भाजपने केले ‘अभिरूप अधिवेशन’ नावाने आंदोलन
मुंबई: सध्या जे सारं चालू आहे ते महाराष्ट्रातील आणीबाणी आहे. आमचा आवाज दाबला जात आहेत. तसेच माध्यमांचीदेखील मुस्कटदाबी केली जात आहे. पण तरीही आम्ही आमचा आवाज दाबू देणार नाही. काहीही झालं तरी आम्ही सरकारविरोधात बोलतच राहणार आणि या सरकारचा भ्रष्टाचार उघडा पाडणार, अशी ठाम भूमिका राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे जे निलंबन झाले ते चुकीचे आहे असे ते म्हणाले. त्याचाच निषेध म्हणून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या नेत्यांनी अभिरूप विधानसभा नावाने आंदोलन करण्यास सुरूवात केली.पण काही वेळाने विधानसभेच्या परिसरात असणाऱ्या मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले. त्यानंतर भाजपचे नेतेमंडळी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले”विधानसभेला पहिल्यांदाच असे येथे उचलून आणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असे झाले आहे. पत्रकारांवर दडपशाही करण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. भ्रष्ट्राचार आम्ही मांडू नये यासाठी काल 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. मी आणि आमचे लोक बोलणार हे माहिती होतं म्हणूनच माईक जप्त करण्यात आला. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता”, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान या महाराष्ट्राने पाहिले. लपविलेल्या मृत्यूची संख्या मी सांगत नाही. सरकारने काय व्यवस्था केल्या? मुंबई, पुण्याची वाट सरकारने लावली. 3 कोटी लसीचा आज ठराव कसा आणता? मोदी सरकारने लस दिली म्हणून एक नंबर वर महाराष्ट्र आहे. कोरोनात किडेमुंग्याप्रमाणे लोक मेले ही वाईट बाब आहे. मुंबईत कोरोना मृत्यू लपविण्यात आले. सरकारने कोरोनाचे 6636 मृत्यू लपवले. मुंबई मॉडेल नाही तर मुंबई हे मृत्यूचे मॉडेल आहे. एकूण 2299 मृत्यू हे कोविड आणि इतर कारण दाखविले आहेत. 72 टक्के मृत्यू अन्य कारणामुळे दाखविले आहेत. दुसऱ्या लाटेत आकडा कमी करण्यासाठी टेस्टिंग कमी करण्यात आले. सरासरी रुग्ण संख्या कमी दाखविण्यात आली”, असा आरोप फडणवीस यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील
“मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे केली.
आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला त्यावर जयंत पाटील यांनी विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. धानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
मार्शल लावून या सगळ्यांना आवाराच्या बाहेर काढा–भास्कर जाधव
“विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्यात येते. स्पीकर लावले जातात. प्रत्येक वेळेला राजकारण केले जाते. आमचं केंद्रात सरकार आहे, आम्ही बोलू तसं वागू. मार्शल लावून या सगळ्यांना आवाराच्या बाहेर काढा असं माझं मत आहे. सभागृहात बसायचं नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाही. आम्ही म्हणू ते करू, याला आत टाकू त्याला आता टाकू. ज्या गावच्या बाभळी त्या गावच्या बोरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायलाच हवी,” अशी मागणी त्यांनी केली.

