मुंबई-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. यावरून राहुल गांधीच्या खच्चीकरणासाठी ही चर्चा सुरू आहे. काँग्रेसला संपवण्याचा हा मोठा कट असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय निरुपम यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ”दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधीं विरोधात अभियान सुरू आहे. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा त्याचाच भाग आहे. या अभिमानानुसार 23 स्वाक्षऱ्यांचे पत्र लिहिले गेले होते. काँग्रेसलाच संपवण्याचा हा मोठा कट आहे.”

