लोक सत्तेसाठी काय काय करतात! शिवसेनेने एका रात्रीत भूमिका कशी बदलली -अमित शहा

Date:

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी 12 वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. या विधेयकात मुस्लिमविरोधी असे काहीच नाही. मुस्लिम या देशाचे नागरिक होते आणि पुढेही राहतील असे अमित शहा म्हणाले. परंतु, त्यांनी विधेयकाची प्रस्तावना वाचली तेव्हाच विरोधकांनी गदारोळ निर्माण केला. काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांनी एकमुखाने या विधेयकाला विरोध केला. राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर रंगलेल्या चर्चेमध्ये एकानंतर एक सर्वांनीच लक्षवेधी भाषणे दिली. दरम्यान, शिवसेनेच्या आक्षेपावर बोलताना लोक सत्तेसाठी काय काय करतात असा टोला गृहमंत्र्यांनी लावला. एका रात्रीत शिवसेनेने या विधेयकावर भूमिका कशी काय बदलली हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगा असेही ते पुढे म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले अमित शहा?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबद्दल देशातील मुस्लिमांमध्ये गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. मी त्यांना खात्री करून देऊ इच्छितो की ते भारतीय नागरिक आहेत आणि नेहमीच भारतीय राहतील. त्यांच्यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा भारतीय मुस्लिमांशी संबंध कसा असू शकतो असा सवाल देखील अमित शहांनी केला. यानंतर विधेयकावर बोलताना, शेजारील देशांमध्ये धार्मिक आधारावर ज्यांना यातना दिल्या जात आहेत त्याच लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. विरोधक यात मुस्लिमांसोबत भेदभाव होत आहे असे आरोप करत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारताचे नागरिकत्व कसे देता येईल अशा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

मोदींवर गांधीजी नाराज तर सरदार पटेल क्रोधित होतील -काँग्रेस

काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले, “आमच्या धर्मात आम्ही पुनरजन्मावर विश्वास ठेवतो. पुनरजन्म घेऊन आपण आपल्या पूर्वजांना भेटतो अशी आस्था आहे. अशात सरदार वल्लभभाई पटेल मोदींना भेटले तर ते निश्चितच क्रोधित होतील. महात्मा गांधी मोदींना भेटल्यावर दुखी होतील. परंतु, सरदार पटेल क्रोधितच होतील.” नागरिकत्व दुरुस्ती विधेयक महात्मा गांधींच्या चष्म्यातून पाहा. घाई करू नका असा सल्ला देखील शर्मा यांनी दिला.

तात्पुरत्या स्थगितीनंतर राज्यसभेचे कामकाज 12 वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. लोकसभेत मंजुरीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जात आहे. परंतु, दिवसाची सुरुवात होताच सभागृहात या मुद्द्यावर गदारोळ निर्माण झाला. विरोधी पक्षांचा आक्रोष पाहता राज्यसभा सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले होते.

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने 24 तासांत आपली भूमिका बदलली. आता या विधेयकावरून अनेक शंका आहेत. त्या दूर होत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही. तसेच मानवतेला कोणताही धर्म नसतो असे शिवसेना खासदार संजय राउत यांनी सभागृहात जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारा राजकीय पक्ष पाकिस्तानची भाषा करत आहेत असे टीकास्त्र पीएम मोदींनी सोडले आहेत.

इतरांना नागरिकत्व देण्यापेक्षा भारतीयांना मूलभूत सुविधा द्या -तृणमूल

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले, “तुम्ही देशातील लोकांना जेवण, कपडे आणि घरासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. त्यातच दुसऱ्या देशातील लोकांना नागरिकत्व आणि अधिकार देण्याच्या गोष्टी करत आहात. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात व्यापक आंदोलन उठले आहे. तुम्ही जाहीरनाम्यात सुद्धा म्हणाला होता की कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. नोटबंदी, बेरोजगारी, गोरखा इत्यादी मुद्द्यांवर पंतप्रधानांचे दावे फौल ठरले. सरकार आश्वासने देण्यात चांगले पण ते पूर्ण करण्यात तेवढेच वाइट आहे. एनआरसीमध्ये बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले आहे. तुम्ही म्हणता, की नागरिकत्व विधेयक सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाईल. ही सुवर्ण अक्षरे राष्ट्रपिता महात्मा गांधी नाही तर मोहंमद जिन्ना यांच्या कब्रीवर लिहिली जातील.”

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...