डिस्को सन्या’ चा ट्रेलर आणि सॉंग चे लाँचिंग संपन्न

Date:

 ‘डिस्को सन्या’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाद्वारे निर्माते, संगीतकार आणि लेखक सचिन पुरोहित- अभिजीत कवठाळकर हे एंटरटेन्मेंटचे कम्प्लिट पॅकेज असलेला, एकसे बढकर एक कम्पोझिशन, दर्जेदार अन् तरुणाईला वेड लावेल अशी गाणी घेऊन अवतरले आहेत. ‘नाचीज को सन्या कहते है…डिस्को सन्या’, अशी तुफान डायलॉगबाजी करणारा ‘डिस्को सन्या’ हा 5 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच मुंबई स्थित फेमस स्टुडिओ मध्ये या बहुचर्चित ‘डिस्को सन्या’  चित्रपटाचे ट्रेलर आणि सॉंग लॉंच करण्यात आले.

डिस्को सन्या या चित्रपटाविषयी बोलताना सचिन पुरोहित म्हणाले की, ‘’मी व माझे कुटूंब गेल्या सहा वर्षांपासून समाजापासून वंचित व अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहोत. अनाथ म्हणून समाजाकडून होत असलेली पिळवणूक, जीवनातील दुःख, संकटे यांचा होत असलेला सततचा मारा अशा परिस्थितही या मुलांची जीवन जगण्याची जिद्द माझ्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्यातील ही जिद्द म्हणजेच चिंगाबुंगा स्पिरीट होय. हा विषय मी माझे सहकारी निर्माते अभिजीत कवठाळकर यांच्याकडे काढला असता अनाथ व वंचित मुलांमधील ही जिद्द चित्रपटातून लोकांसमोर आणण्याचे आम्ही ठरविले आणि त्याचवेळी डिस्को सन्याचा जन्म झाला. परंतू ही एक उपदेशात्मक कथा न ठेवता व्यवसायिक दर्जाची फॅमिली एंटरटेनर व प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी फिल्म असावी हे ठरवूनच डिस्को सन्याची निर्मीती केली आणि त्यात आम्ही यशस्वी झालोय, असं मला वाटतं. तसेच ही फिल्म प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी मला खात्री आहे.’’

बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ सिनेमात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला महाराष्ट्राचा लाडका ‘वंडर किड’ पार्थ भालेराव ‘डिस्को सन्या’ या मराठी सिनेमातून पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात एकूण 3 गीते व एक प्रमोशनल सॉंग आहे. ‘सर्व धर्म समभाव’ असा संदेश देणाऱ्या ‘जय हरी विठ्ठला,अल्लाह हू अकबर’ या गाण्यात बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाणे देणारे गायक शबाब साबरी (प्रथमच मराठीत) यांच्या सुफी स्टाईलच्या जोडीला प्रख्यात लोकशाहीर नंदेश उमप यांच्या लोकसंगीताचा वापर करून आगळीवेगळी संगीतरचना केली गेली आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘साधं माझं रूप’ या मराठमोळ्या गाण्याला दक्षिण भारतातील पारंपारिक वाद्यांचा ताल देण्याचा नवा प्रयोग करीत दाक्षिणात्य वादकांकडूनच ‘तारा तपट्टाई’ या वाद्याचा सुरेख वापर या गाण्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे वाद्य वाजविण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता थेट चेन्नाई येथे या गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...