पुणे-थर्ड बेल एन्टरटेनमेंट तर्फे कलातीर्थ पुरस्कार वितरण सोहळा काल पुण्यात अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडला. जेष्ठ दिग्दर्शीका श्रीमती सुमित्रा भावे ह्यांच्या हस्ते विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, समृद्धी पोरे, केदार शिंदे, सतीश राजवाडे, मंदार देवस्थळी, मंगेश कदम, राजेश देशपांडे, हेमंत देवधर, उमेश कुलकर्णी, गजेंद्र आहीरे ह्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .. ह्या प्रसंगी बोलताना सुमित्रा भावे ह्यांनी हा एक आगळ्यावेगळ्या प्रकारचा व कलेची खरी पारख करून त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पुरस्कार असल्याचे म्हटले.
त्याच बरोबर इतर क्षेत्रांप्रमाणेच दिग्दर्शनाच्या क्षेत्रातदेखील अधिकाधीक महिलांनी पुढे येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण काम करून दाखवावे असे आवाहन केले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, गजेंद्र अहिरे व विजय केंकरे ह्यांनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत हा पुरस्कार स्विकारताना अधिक आनंददायी असल्याचे सांगितले. दिग्दर्शीका समृद्धी पोरे ह्यांनी देखील ह्या गौरवाबद्दल बोलताना हा खऱ्या कलेचा केला गेलेला सन्मान असल्याचे म्हटले. थर्ड बेल एन्टरटेनमेंट चे प्रमुख स्वप्नील रास्ते ह्यांनी प्रस्तावीक करताना हा उपक्रम केवळ आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील कलाकांराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याससाठी दरवर्षी घेतअसल्याचे सांगीतले. ह्याच पुरस्कार वितरणासोबत दरवर्षी प्रमाणे पड्द्यामागील विवीध कलाकार, तंत्रज्ञ, पत्रकार आदींचा डॉ. सतिश देसाई ह्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. यात नाट्यव्यवस्थापक गुरु वठारे, पत्रकार अभिजीत थिटे, छायाचित्रकार मृणाल काळसेकर, आर.जे. स्मिता, आर.जे. शोनाली, ध्वनी व्यवस्थापक नितीन जोशी, रंगभूषाकार, वेशभूषाकार, केशभूषाकार आदींचा समावेश होता. थर्ड बेल एन्टरटेनमेंट चे प्रमुख स्वप्नील रास्ते ह्यांनी प्रस्तावीक केले. प्रज्ञा रास्ते ह्यांनी आभार मानले.
दिग्दर्शकांना कलातीर्थ पुरस्कार प्रदान
Date:

