पुणे- राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 423 व्या जयंतीच्या निमित्ताने जयंतीच्या पूर्वसंध्येला लाल महाल येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुणे जिल्ह्यातील पाच किल्ल्यावरील पाण्याने पुण्यातील महिला पत्रकार नुपूर (पुढारी), सोनाली गायकवाड-भालेसईन (महाफास्ट), पियुषा अवचर (प्रभात), पुनम काटे (पोलीसनामा) हस्ते ‘जलाभिषेक’ करण्यात आला.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन व शिवप्रेमींच्या वतीने ‘लाल महाल’ येथे जलाभिषेक व दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी केले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, राजश्री शाहू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, मंदार बहिरट, विनायक घुले, सुशील पवार, मुकेश यादव, प्रशांत कुंजीर, स्मिता पवार, राहूल दुर्गे, क्षितेज निंबाळकर, विशाल कदम, अनिकेत पाटील, युवराज ढवळे आदी उपस्थित होते.

