पुणे :
आषाढी अमावस्या (गटारी अमावस्या) परंपरेप्रमाणे दीप अमावस्या म्हणून साजरी करण्यासाठी आज (मंगळवारी) ‘प्रबोधन माध्यम’ संस्थेने महिलांच्या सामूहिक दीपपूजनाचे आयोजन केले होते.
दीप अमावस्या ही परंपरा विसरून गटारी अमावस्या आणि त्यानिमित्त सामिष सेलिब्रेशन ही नवीनच प्रथा रूढ झाली असताना दीप अमावस्येची सायंकाळ ही दीपपूजनाची, प्रकाशाच्या पूजनाची आणि श्रावणाचे स्वागत करण्याची आहे, हे अधोरेखीत करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. , अशी माहिती संस्थेच्या संचालक गौरी बिडकर यांनी दिली.या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते
मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळून टाकण्यात आला . विठ्ठल -रखुमाई ची आरती करण्यात आली . दीप पूजनाचे महत्व सांगण्यात आले .
हा कार्यक्रम नवी पेठ विठ्ठल मंदीर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. नवी पेठ विठ्ठल मंदिर, टिळक रोड, पुणे येथे ‘प्रबोधन माध्यम’संस्थेच्या संचालक गौरी बिडकर, संस्थापक दीपक बिडकर, नवी पेठ विठ्ठल मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष संजय गाडे,गणेश आढाव ,सदाशिव भावे ,हरिशचंद्र सातपुते ,विजय जोशी (गुरुजी ) ,सौ . पेठकर ,उपस्थित महिलावर्ग आणि नागरिकांनी सामूहिक दीपपूजन करून आषाढी अमावस्येच्या सायंकाळी श्रावण मासाचे स्वागत केले.
‘आषाढ संपत आहे, श्रावण येत आहे, आषाढ समाप्ती अमावस्येने होते, तमाम जनता या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणते, खरे तर याच दिवशी दीप अमावस्या असते. दिव्याची अमावस्याही लक्ष्मी पूजनाची मानली जाते. घरातील सर्व दिवे छान घासून पुसून लख्ख करून त्याची पूजा करावी. प्रकाशाची कहाणी ऐकून संस्कृतीचा जागर करणार्या श्रावणाचे स्वागत करण्याचा दिवस आहे, असा संदेश या दीपपूजनाने मिळतो, असा संदेश अधोरेखीत करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम’संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.’ असे संस्थेच्या संचालक गौरी बिडकर म्हणाल्या.
‘व्यसनांचा सार्वजनिक अंधार गटाराकडे जात असताना प्रकाशाचा, संस्कृतीचा जागर करण्याची हीच वेळ आहे, ‘गटारी ऐवजी दीप लावू, व्यसन मुक्तीचे संदेश देवू, नको व्यसनाचा अंधार, हवा ज्ञानाचा प्रकाश’ अशी जाणीवच जणू या महिलांनी करून दिली’ असे संजय गाडे म्हणाले .

