पुणे- मुख्यमंत्री सहाय्यता निधीस बुधवारी विविध व्यक्ती आणि संस्थानी मदत दिली. यावेळी विकास मडिगेरी, मुकुंद भवन स्ट्रस्ट, सुरेश परांजपे, राजू नानजकर, सुहासिनी बिवलकर,सुरेश परांजपे, दिलीप उंबरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे तसेच मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.