माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता

Date:

पुणे : शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान  असून महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा येथील कौन्सिल हॉल मध्ये पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती प्रशासन विभागाचे संचालक अजय अंबेकर, माहिती, वृत्त व जनसंपर्क विभागाचे संचालक सुरेश वांदिले, माहिती संचालक हेमराज बागूल, माहिती संचालक गणेश रामदासी, विशेष कार्य विभागाचे संचालक शिवाजी मानकर तसेच राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद (मराठवाडा) संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रशिक्षणाची किमया’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिलीप पांढरपट्टे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले, बदलत्या काळानुसार अधिकाऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात. कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ज्ञान ग्रहण करुन त्याचा दैनंदिन कामकाजात वापर करा, असे सांगून  डॉ. पांढरपट्टे म्हणाले, लोकराज्य मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मासिक असून प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मला लोकराज्य मासिकातील माहितीचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाची व्याप्ती पाहता विविध प्रशासकीय निर्णय गतीने घेण्यात येतील, असे सांगून विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांचे नूतनीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून यासाठी आवश्यक ते प्रशासकीय पातळीवरील निर्णय गतीने घेण्यात येतील, असे  आश्वासन डॉ. पांढरपट्टे यांनी दिले. मराठी भाषा दिन कार्यक्रम यशस्वीपणे राज्यभरात राबविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत विभाग निहाय मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षातील कामाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याला यंदा 60 वर्ष पूर्ण होणार असून यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले. तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासाठीच्या उपाययोजना, रिक्त पदभरती, वेगवान इंटरनेट सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा झाली. फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे संचालक भुपेंद्र कँथोला, समन्वयक रितेश ताकसांडे यांनी मोबाईल जर्नालिझम बाबत सादरीकरणा द्वारे माहिती दिली.

माहिती संचालक अजय अंबेकर यांनी प्रास्ताविकातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मागील वर्षात घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षात करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला निवृत्त उपसंचालक जगदीशकुमार निर्मल, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सतिश जाधव आणि परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी विकास माळी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पुणे विभागाच्या वतीने माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. तसेच संवाद वारी, माळीण पुनर्वसन असे माहितीपट दाखवण्यात आले. मोहन राठोड यांनी आभार मानले. यावेळी संचालक व उपसंचालक यांनी नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण केले.  कार्यशाळेला राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय माहिती कार्यालयाच्या नुतनीकरण कामाचे

सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन

नूतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक तसेच प्रसिद्ध कवी व गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. नुतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन राज्यातील सर्व माहिती कार्यालये या पध्दतीने सुशोभित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रशासकीय पातळीवर निश्चितच मदत करण्यात येईल, असे  आश्वासन डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे संचालक अजय अंबेकर, संचालक सुरेश वांदिले, संचालक शिवाजी मानकर, उपसंचालक मोहन राठोड, पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा माहिती अधिकारी  राजेंद्र सरग, रवींद्र राऊत, युवराज पाटील, वृषाली पाटील, गणेश फुंदे तसेच अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...