Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल -उपमुख्यमंत्री

Date:

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्तेि मुख्यव शासकीय ध्व्जारोहण झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. पवार यांनी विविध पथकांची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व विशेष सुरक्षा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय पथक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी संचलन केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, वन विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग यांनी माहितीपर चित्ररथ सादर केले. यावेळी पोलीस वाद्यवृंद, वाहतूक पोलीस मोटर सायकल रायडर पथक, श्वान जॅक गुन्हे शोधक यांनी सलामी दिली.
देशाच्या जडणघडणीत सर्व देशवासीयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आपण सदैव स्मरणात ठेवायला हवा, असे सांगून कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्म पुरस्कार, पद्मविभुषण, पद्मभुषण, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच पेालिस व अग्निशमन सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचा-यांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आजपासून ‘प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान’ सुरु करण्यात येत असून हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. सर्वांच्या सहकार्यातून ही लोकचळवळ यशस्वी करावी, असे आवाहन करुन श्री. पवार म्हणाले, कृषी आयटीआय सारखी नवीन संकल्पना राबविण्यात येणार असून त्यापैकी एक महत्त्वाची संस्था पुणे जिल्ह्यात तयार होणार असून राज्यातील तरुणांचा कौशल्य विकास साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. मुंबईसह कोकण किनारपट्टी, पुणे तसेच राज्यातल्या अनेक भागातल्या हेरिटेज वास्तू व पर्यटन स्थळांचे हेरिटेज सौंदर्य वाढवून या ठिकाणी पर्यटन विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पुण्यात मेट्रोची कामे गतीने होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत निश्चितच सुधारणा होईल. सहकार, कृषी, उद्योग विभागाला चालना देण्याबरोबरच तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यावर राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे व सतर्कतेमुळे गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाचा ‘भरोसा सेल’ महत्त्वपूर्ण काम करत आहे. तसेच आयटी उद्योगात काम करणाऱ्या महिलांसाठी ‘बडीकॉप’ तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलीस काका’ अशा योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. पोलिसांच्या उल्लेखनीय कार्यामुळेच यावर्षी पुणे पोलिसांना राष्ट्रीय पातळीवरील पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, हे गौरवास्पद आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला!

हिंगोली - काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी...

CM ची आज सभा आणि मध्यरात्री भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार

मुंबई-आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा...

“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन...

एपस्टाइन फाईल १९ डिसेंबरला जाहीर होणार काय ? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात समजून घ्या …

पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein Files बाबत भारतात उडविली खळबळ अमेरिकेच्या...