पीएमआरडीए’च्या पाणी पुरवठ्यासाठी सर्वंकष आराखडा सादर करा- नगरविकास मंत्री शिंदे यांचे आदेश

Date:

मुंबई-पुणे महानगर प्रदेशातील लोकसंख्येला प्रतिदिन दरडोई अवघे ७० लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अपुरा पाणी पुरवठा या भागाच्या विकासात प्रमुख अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला भविष्यात आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्याचे नियोजन कशा पध्दतीने करता येईल, त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिले.
पीएमआरडीएची आढावा बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मेट्रो प्रकल्प, रिंग रूट या पुणे परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांसह पीएमआरच्या पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरही चर्चा झाली.
पीएमआरला २०३१ सालापर्यंत सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तूर्त कोणतेही ठोस नियोजन झालेले नाही. खडकवासला धरणातून कॅनलद्वारे पुरविले जाणारे पाणी बोगद्याच्या माध्यमातून पुरविणे, जिल्ह्यातील धरणांमधून काही ठराविक पाणी साठा पीएमआरसाठी उपलब्ध करून देणे, मुळशीच्या टाटा पॉवर प्लँटमधून पाण्याची उपलब्धता आदी काही पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर या सर्व पर्यायांचे सविस्तर सादरीकरण करावे. त्यानंतर पुढील निर्णय घेता येईल असे एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुणे शहरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित केलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे भूसंपादन आणि बांधकामाचा खर्च जास्त आहे. त्यामुळे या रिंग रोडचे काम टप्प्याटप्प्याने करणे जास्त संयुक्तीक ठरेल का, याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच, पुणे शहराच्या सुधारीत विकास आराखड्याची मुदत उलटली आहे. सहा महिने वाढीव मुदतही एप्रिल महिन्यांत संपणार आहे. त्यापुर्वी या आराखड्याची प्रक्रिया पूर्ण करा असेही एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले
कारशेडची जागेचा मार्ग मोकळा
हिंजवडी – शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेल्या कारशेडसाठी १३ हेक्टर जागेचे भूसंपादान करावे लागणार आहे. त्यापैकी ७ एकर जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली असली तरी उर्वरीत खासगी जागा संपादीत करण्यात अडथळा निर्माण झाला होता. हे भूसंपादन सक्तीने करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यानंतर जमीन मालकाने जागा हस्तांतरीत करण्यास सहमती दर्शवल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत नियमानुसार आर्थिक मोबदला देत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर.

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७,...

महावितरणला हरित ऊर्जा शिखर परिषदेत मानाचा पुरस्कार

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२६: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी...

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...